Mormugao Municipal Council Meeting  Dainik Gomantak
गोवा

Mormugao: मुरगावातील 'ब्लॅक स्पॉट'चे रुपडे पालटणार! कचरा व्यवस्थापनासंदर्भात पालिकेचा निर्णय, CCTV ठेवणार नजर

Mormugao Municipal Council Meeting: मुरगाव क्षेत्रातील कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जागरूकता करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, यासबंधी चर्चा करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: मुरगाव पालिका मंडळाच्या घनकचरा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत दारोदार कचरा गोळा करणे, सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, ‘ब्लॅक स्पॉट’च्या जागेचे सौंदर्यीकरण करणे वगैरे विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे मुरगाव पालिकेच्या कायमस्वरूपी व कंत्राटी अशा सर्व सफाई कामगारांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या समितीचे अध्यक्ष व नगरसेवक नारायण बोरकर यांच्यासह नगराध्यक्ष गिरीश बोरकर, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, नगरसेवक दामू नाईक, यतीन कामुर्लेकर, शमी साळकर, दामोदर कासकर, मुरगाव पालिका निरीक्षक, अभियंते उपस्थित होते.

मुरगाव पालिका क्षेत्रातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जागरूकता करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, यासबंधी चर्चा करण्यात आली. दारोदार कचरा गोळा करणाऱ्या कामगारांकडे काहीजण कचरा देत नाहीत.

त्यानंतर तो कचरा इतरत्र फेकतात. जेणेकरून काही ठिकाणी ‘ब्लॅक स्पॉट’ तयार झाले आहेत. यासंबंधी चिंता व्यक्त करण्यात आली. हे ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी त्या जागांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेथे पुन्हा कचरा टाकू नये यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी उच्च गुणवत्ता असलेल्या एकंदर पाच कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येईल. प्रत्येक प्रभागात प्रत्येक सप्ताहात एका कॅमेराचा वापर केला जाईल. कॅमेऱ्यासाठी रोटेशन पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी असा प्रयोग करण्यात आला होता. कचरा टाकणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जेणेकरून संबंधितांना वचक बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

...तर करणार कायदेशीर कारवाई

दारोदार कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या कामगारांकडे कचरा न देता रस्त्यावर व इतर ठिकाणी काहीजण कचरा टाकतात, त्यासंबंधी योग्य कारवाई करण्यात येईल. सॅनिटेशन शुल्क देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची नावे त्या कामगारांकडून गोळा करण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक प्रभागातील प्रत्येकी दहाजणांना कायदेशीर कारवाईसंबंधी नोटिसा पाठविण्यात येतील.

त्यानंतरही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास त्यासंबंधी सुनावणी होईल व संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळप्रसंगी त्यांची पाणी, वीज जोडणी तोडण्याची तरतूद आहे. त्याचा वापरही केला जाण्याची शक्यता आहे. कचरा व्यवस्थापनासंबंधी कोणती पावले उचलली पाहिजेत यासंबंधीही पाहणी करण्यात येईल.

नागरिकांसोबत हुज्जत

सफाई कामगारांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कंत्राटी कामगारांकडे ओळखपत्रे नसल्याने तसेच गणवेश नसल्याने त्यांना ओळखणे कठीण होते. काहीवेळा नागरिक त्यांच्याकडे हुज्जत घालतात, तेव्हा नागरिकांना ते मुरगाव पालिकेचे कंत्राटी कामगार असल्याचे लक्षात येत नाही. त्याचा गैरफायदा कदाचित ते कंत्राटी कामगार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी त्यांना ओळखपत्र देणयाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT