Morjim Hill Cutting Dainik Gomantak
गोवा

Morjim Hill Cutting: डोंगर कापणीत गुंतलेल्यांना कठोर शासन व्हावे; मोरजीवासीयांचे गाऱ्हाणे

Morjim: मोठ्या प्रमाणात जमिनी सरकारने रूपांतरित केल्यामुळे या डोंगर माळरानावर ‘मेगा प्रकल्प’ उभे रहात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जमीन रूपांतरण आणि डोंगर कापणी प्रकरणात जे कोण गुंतलेले आहेत, त्यांना कठोर शासन करावे, अशा आशयाचे सामुदायिक गाऱ्हाणे भाटिवाडा मोरजी येथील शेतकरी, जमीनदार, ग्रामस्थांनी श्री देव सत्पुरुष आणि श्री देव कानडी वंश देवाला घातले.

मोरजी पंचायत क्षेत्रातील डोंगर भागातील मोठ्या प्रमाणात जमिनी सरकारने रूपांतरित केल्यामुळे या डोंगर माळरानावर ‘मेगा प्रकल्प’ उभे रहात आहे. मोठ्या प्रमाणात जमिनी बिगर गोमंतकीयांनी विकत घेतलेल्या आहेत. या जमिनी विकत घेताना ज्या ठिकाणी देवाची स्थळ आहेत.पारंपरिक वाटा आहेत, त्या वाटाही बंद केल्या.

देवस्थानांकडे जाणाऱ्या वाटा अडवण्याचाही प्रकार घडला आहे . यामध्ये जे जे कोणी सहभागी आहेत, त्याला सरकारने शासन करावे. अशा प्रकारचे सामुदायिक कारणे भाटिवाडा मोरजी येथील लोकांनी श्री देव सत्पुरुष आणि श्री देव कानडीवंस देवाला घातले.

देवांनी ३ दिवसांत शासन करावं!

देवाची स्थळे आहेत .ज्या ठिकाणी धार्मिक विधी करण्यासाठी प्रत्येक वेळा नागरिकांना गावकऱ्यांना त्या ठिकाणी जावे लागते. त्या ठिकाणी त्यांची पायवाटाच अडवलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे अशांना तीन दिवसांच्या आत देवाने शासन करावे, असे गाऱ्हाणे यावेळी घालण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT