Morjim News Dainik Gomantak
गोवा

Morjim News : दाभोलकरवाडा-गावडेवाडा रस्ता म्हणजे सध्या मृत्यूचा सापळा!

सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता विभाग किती जागृत आहे. हे या रस्त्याच्या अवस्थेकडे पाहताच दिसून येते.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी पंचायत क्षेत्रातील दाभोलकरवाडा ते गावडेवाडा पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात चाळण झालीआहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता विभाग किती जागृत आहे. हे या रस्त्याच्या अवस्थेकडे पाहताच दिसून येते. मोरजी पंचायत क्षेत्रातील गावडेवाडा पर्यंतचा किनारी भागात जाणारा रस्ता म्हणजे सध्या मृत्यूचा सापळा बनलेला आहे. रस्ता शोधताना खड्ड्यांमध्ये कधी वाहन जाते, त्याचा पत्ताच लागत नाही.

किनारी भागात रस्ता झाल्यामुळे पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटन घेऊ लागले. व्यावसायिकांचा विस्तार वाढू लागला. नंतर रस्ता रुंदही झाला. परंतु त्यानंतर संबंधित जमीन मालकांनी किंवा कुळाने रस्त्यालगत कवाथे लावून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. याकडे स्थानिक पंचायत, स्थानिक आमदार आणि सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे हा रस्ता वादात सापडलेला आहे.

रस्त्यामुळे किनारी भागात व्यावसायिकांना प्राधान्य मिळाले. सीआरझेडचे उल्लंघन करूनही मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांनी बांधकामे केली. जमिनी पटापट विकल्या गेल्या. आणि या जमिनीत हॉटेल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अरुंद रस्त्यामुळे हॉटेलसाठी टीसीपी परवाना देऊ शकत नसल्याने, काही प्रमाणात रस्ता रुंदीकरणाचाही प्रयत्न झाला.

केबलसाठी खोदलेले रस्ते ‘जैसे थे’

या रस्त्यावरून भूमिगत वीज केबल घालत असताना रस्ता मधोमध खणण्यात आला होता. परंतु पावसाळा सुरू झाला तरी खणलेले खड्डे व्यवस्थित चर बुजवली गेली नसल्यामुळे ठीक ठिकाणी पाणी साचून रस्ता नेमका कुठला किंवा खड्डे नेमके कुठले याचा पत्ता लागत नाही. यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित लक्ष देऊन या रस्त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT