Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach : मोरजी किनाऱ्यांवर भूमाफियांचा डोळा; स्थानिक मच्छीमारांचा दावा

Local Fishermen : किनारी भागातील जमिनी या बिगर गोमंतकीयांनी विकत घेतलेल्या असून अशा जमीन माफियांना सरकारचा पाठिंबाही मिळत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी, विठ्ठलदास वाडा किनारी भागात आलेक्स फर्नांडिस यांच्या मालकीच्या दोन होड्यांना गुरुवारी (ता.२५) आग लागून सुमारे अकरा लाखांचे नुकसान झाले.

त्यावर स्थानिक मच्छीमार व्यावसायिकांनी मोरजी किनारी भागातील जमिनींना सोन्यापेक्षाही भाव मिळत असल्यामुळे या जमिनींवर ‘माफियां’चा डोळा आहे, असा दावा करत हे कृत्यही या माफियांनीच केले असण्याची शक्यता व्यक्त केली.

किनारी भागातील जमिनी या बिगर गोमंतकीयांनी विकत घेतलेल्या असून अशा जमीन माफियांना सरकारचा पाठिंबाही मिळत आहे.

आजपर्यंत मच्छीमार बांधवांच्या ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होड्या, झोपड्या आहेत, तिथे जाणाऱ्या पायवाटाही बंद करण्याचा प्रकार जमीन माफियांकडून होत असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिक पंचसदस्य विलास मोरजे, संजय कोले यांनी केली आहे.

मागच्या नऊ वर्षांपूर्वी विठ्ठलदास वाडा किनारी भागात भूमाफियांकडून सुरक्षित ठेवलेल्या पारंपरिक नऊ होड्यांना आगी लावण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली; परंतु आजपर्यंत ज्यांचे नुकसान झाले, त्यांना कसल्याच प्रकारचा मोबदला मिळाला नाही.

आता पुन्हा एकदा अशी घटना घडली असून भूमाफियांनीच या दोन होड्यांना आग लावल्याचा संशय आहे. या होड्यांसोबतच त्या ठिकाणी सुरक्षित ठेवले जाणारे मच्छीमारीचे साहित्य आणि जाळ्यांनाही आग लागून आलेक्स फर्नांडिस यांचे सुमारे ११ लाखांचे नुकसान झाले आहे.

मच्छीमारांवर अन्याय : मच्छीमार बांधव असुरक्षित असल्याचा प्रकार वारंवार घडत आहे. मागच्या नऊ वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने होड्यांना आग लावली त्याचीच पुनरावृत्ती यंदाही घडली आहे.

दोन घोड्यांना आगी लावून नुकसान केले. त्यानंतर गेल्या वर्षी याच ठिकाणी पारंपरिक मच्छीमारांनी उभारलेली एक झोपडी पर्यटन खात्याने त्यांना कसल्याच प्रकारची कारणे दाखवा नोटीस न पाठवता जमीनदोस्त केली होती.

हॉटेलसमोरील अडथळे हटवतात

१ एका बाजूने सीआरझेडचे उल्लंघन करून किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीयांनी व्यवसाय थाटलेले आहेत. मोठ-मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट बांधलेली आहेत आणि या हॉटेलच्या समोर ज्या मोकळ्या जमिनी कॅप्टन ऑफ पोर्ट किंवा सरकारच्या हद्दीत येतात त्या जमिनींवर या किनाऱ्यावर भूमाफियांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

२ आपल्या हॉटेलसमोर बसल्यानंतर पर्यटकांना परिसर स्वच्छ दिसावा, कसल्याच प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून भूमाफिया प्रयत्नशील आहेत आणि त्याच अनुषंगाने ज्या पारंपरिक मच्छीमारांच्या होड्या, झोपड्या आहेत त्या ठिकाणी जाणाऱ्या पारंपरिक पायवाटाही अडवण्याचा प्रकार घडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT