Cutbona Jetty  Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: कुटबण जेटीवरील सर्व मजुरांची तपासणी आवश्यक! जास्त मजूर मृत्युमुखी पडल्याची शक्यता

Cruz Silva: कुटबण जेटीवरील परिस्थितीची मुख्यमंत्र्यांना माहिती देणार, मजुरांवर बाळ्ळी केंद्रामध्ये उपचार सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: कुटबण जेटीवर पाच मजुरांचा मृत्यू झाला, अशी नोंद केली असली तरी प्रत्यक्षात जास्त मजूर मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. येथे कॉलरा व इतर रोगांमुळे मच्छीमार मजुरांवर जी परिस्थिती ओढवली आहे त्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देणार आहे, असे आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले.

क्रुझ सिल्वा म्हणाले की, काही मजुरांवर बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. काहींना जिल्हा इस्पितळात तर काहींना बांबोळी-गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे त्याची जाणीव कुणालाच नाही. मुख्यमंत्री व मत्स्यव्यवसाय खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना माहिती देण्यात येईल.

शनिवारी केळशी व परिसरातील काही नागरिक आमदार क्रुझ सिल्वा यांना भेटले. या नागरिकांनी येथील परिस्थिती गंभीर असून स्थानिकांना त्याची झळ बसण्यापूर्वी तत्काळ उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी केली. २००७ पासून कुटबण जेटीवरील उपआरोग्य केंद्र बंद आहे. ते पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. शिवाय डॉक्टर, ॲम्ब्युलन्स सेवा आदीची व्यवस्थाही आवश्यक आहे.

वेळेत उपचार गरजेचे

कुटबण जेटीवरील मजुरांच्या रक्ताची चाचणी केली आहे व काहींना कॉलरा झाला असल्याचे त्यातून निष्पन्न होत आहे. या मजुरांवर तत्काळ उपचार आवश्यक आहेत. बोटमालकांनी लवकरात लवकर आपल्या सर्व मजुरांची माहिती द्यावी. त्यांची वेळेत तपासणी होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बेनेदिता डायस यांचे म्हणणे आहे.

तोपर्यंत जेटी बंद ठेवा!

कुटबण जेटीवर जी आरोग्यविषयक समस्या आहे, त्याबाबत केळशीतील नागरिकांमध्ये भीती आहे. संबंधित खात्याने या जेटीवरील मच्छीमार व्यवसाय तात्पुरता खंडित करावा. जोपर्यंत पूर्ण उपाययोजना होत नाही किंवा मजुरांचे आरोग्य सुधारत नाही तोपर्यंत ही जेटी बंद ठेवावी, अशी मागणी स्थानिक रुझारियो फर्नांडिस यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT