Ramdev Baba In Goa  Dainik Gomantak
गोवा

Ramdev Baba In Goa: गोव्यात बाबा रामदेव म्हणतात, माझ्या वेळेचे मूल्य टाटा, बिर्लांपेक्षा जास्त कारण...

गोव्याची 'भोग' नव्हे तर 'योग' भूमी म्हणून ओळख व्हावी असेही वक्तव्य रामदेव बाबांनी येथे केले.

Pramod Yadav

Ramdev Baba In Goa: योगगुरू रामदेव बाबा तीन दिवसीय योगा शिबिरानिमित्त गोव्यात आहेत. पणजीतील मिरामार बीच येथे 18 फेब्रुवारीपासून योगा शिबीर सुरू आहे. रामदेव बाबांनी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमात देखील सहभाग घेतला.

गोव्याची 'भोग' नव्हे तर 'योग' भूमी म्हणून ओळख व्हावी असेही वक्तव्य रामदेव बाबांनी येथे केले.

रविवारी पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत रामदेव बाबांचे सहाय्यक आचार्य बाळकृष्ण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

"मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी येथे आलो आहे. अब्जाधीश अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला यांच्यापेक्षा माझ्या वेळेचे मूल्य अधिक आहे. कॉर्पोरेट्स लोक त्यांचा 99 टक्के वेळ स्वत:च्या स्वार्थासाठी घालवतात, तर द्रष्टे लोक सामान्यांच्या हितासाठी वेळ घालवतात." असे रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

यावेळी रामदेव यांनी त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांचे कौतुक केले. "बाळकृष्ण यांनी व्यावसायिक प्रशासन, पारदर्शक व्यवस्थापन याच्या मदतीने पंतजलीचे पुनरुज्जीवन केले. कंपनीने या आर्थिक वर्षात ₹40,000 कोटींची उलाढाल केलीय.

पतंजलीसारख्या कंपन्या निर्माण करून भारताला “परम वैभवशाली” बनवण्याचे स्वप्न साकार होऊ शकते." असेही रामदेव म्हणाले.

कोविड -19 साथीच्या आजारानंतर देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा दावा केला जात आहे. पण, वैद्यकीय तज्ञांच्या मते कोरोनाचा याच्याशी काही संबंध नाही.

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढ होत आहे आणि त्याचा साथीच्या आजाराशी काहीही संबंध नाही, असे एका प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ म्हणाले.

गोव्यातील मिरामार समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या पतंजली योग समितीने योग शिबिराचे आयोजन केले आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT