Parking Area Gomantak Digital Team
गोवा

Moraji No Parking : ‘नो पार्किंग झोन’ आदेशाचे काय झाले ?

मोरजी ग्रामस्थांत संताप : बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी : मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे वाहने पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात होता. ही बाब लक्षात घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ घोषित केला होता.

पंचायतीने तीन ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’चे फलक लावले. परंतु इतरत्र ‘नो पार्किंग झोन’चे फलक का लावले नाहीत, असा सवाल गजानन शेटगावकर यांनी उपस्थित केला आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रातील राज सुपर मार्केट ते बास्कीन रॉबिन शॉप पर्यंतच्या २५० मीटर क्षेत्रात ‘नो पार्किंग झोन’ जाहीर केला आहे. शिवाय मधुकर वाईन स्टोअर ते ग्रँड इन रिसॉर्ट या ३५० मीटर रस्त्याच्या दुतर्फा, रत्नदीप रेस्टॉरंट ते गावडेवाडा जंक्शन १५० मीटर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा, ‘नो पार्किंग झोन’ आहे.

मोहन गॅरेज ते कॉटेज सुपर मार्केट ४०० मीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा ‘नो पार्किंग झोन’ आहे. मात्र, फलक लावलेले नाहीत. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी २७ जून २२ रोजी दिलेल्या आदेशात ‘नो पार्किंग’चे फलक लावावेत,असे म्हटले होते.

मोरजीतील विविध रस्त्यांवर ‘नो पार्किंग झोन’ जाहीर झालेले आहेत. त्या त्या ठिकाणी फलक लावण्यात येतील. फलक तयार करायला दिलेले आहेत, ते लावले जातील.

सुरेखा अमित शेटगावकर, मोरजी सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

SCROLL FOR NEXT