Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रोड ठरतोय चालकांसाठी डोकेदुखी

डोंगर माळरानावरील आणि अन्‍यत्र माती रस्त्यावर येऊन मुख्य रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोपा लिंक रोडचे काम भरपावसात सुरू असल्यामुळे उड्डाणपुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. डोंगर माळरानावरील आणि अन्‍यत्र माती रस्त्यावर येऊन मुख्य रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. याकडे अजून सरकारचे लक्ष नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. (Mopa Link Road is dangerous for drivers)

नागझर जंक्शन ते मोपा विमानतळ या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम भरपावसातही सुरू आहे. या कामामुळे वाहनचालकांना त्याची बरीच झळ बसत आहे. दुसऱ्या बाजूने मोपा लिंक रस्त्यासाठी धारगळ सुकेकुळण ते मोपा विमानतळ लिंक रस्त्याचे काम सुरू आहे.

खोदलेल्या खड्ड्यातील मातीचा व्यवस्थित निचरा न केल्याने ही माती मुख्य रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येत असल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहे. दरम्‍यान, खोदकाम केलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अपघातापूर्वी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे (Goa Marathi News)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT