Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : ठरलं! मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 'या' नावावर शिक्कामोर्तब

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण चर्चेला मिळाला पुर्णविराम

दैनिक गोमंतक

गोवा राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोपा विमानतळ नामकरणावरुन चर्चेला उधाण आले आहे. याला आता पुर्णविराम मिळाला आहे, कारण मोपा विमान तळाला गोव्याचे लाडके सुपुत्र व माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

(Mopa International Airport has been named as Manohar International Airport)

मिळालेल्या माहितीनुसार मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असे करण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हा कार्यक्रम उद्या दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी पार पडणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा सरकारने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नावाला राज्य सरकारने पसंती देत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्याला केंद्र सरकारने देखील हिरवा कंदिल दाखवला आहे. यावरुन मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोपासाठी 'या' नावांसाठी होती मागणी

मोपा विमानतळाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, यांच्यासह जॅक सिक्वेरा, भाऊसाहेब बांदोडकर, स्वातंत्र्यसैनिक डॉ. टी. बी. कुन्हा यांचे नाव द्यावे अशी मागणी होत असताना नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यानावावर शिक्का मोर्तब झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT