Mopa Airports | Goa News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport...अन्यथा गोवा महाराष्ट्रात विलिन झाला असता; मोपा नामकरणावरुन 'चर्चिल' यांचे वक्तव्य

''मोपा विमानतळाला डॉ. जॅक सिक्वेरा यांचे नाव द्या''

दैनिक गोमन्तक

गोमंतकीयांना आता 'मोपा'च्या उद्धाटनाचे वेध लागले आहेत. असे असताना मोपाला कोणाचे नाव ? यावरुन वातावरण तापले आहे. कारण मनोहर पर्रिकर यांचे नाव देता येईल का? असा एक मतप्रवाह आहे. तसेच राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी मोपाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्या असे ठराव पास केले आहेत. यातच राज्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी डॉ. जॅक सिक्वेरा यांचे नाव सुचवल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(Mopa Airport to be named after Jack Sequeira demanded Churchill Alemao)

मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी मोपा नामकरणावरुन आज वक्तव्य केले आहे. आलेमाव यांनी मोपा विमानतळाला डॉ. जॅक सिक्वेरा यांचे नाव देणे योग्य होईल असे म्हटले आहे. याचे स्पष्टीकरण देताना चर्चिल म्हणाले, गोमंतकीयांना सिक्वेरा यांचे ऋण कधीच विसरता येणार नाहीत. ते नसते तर गोवा कधीच महाराष्ट्रात विलिन झाला असता. केवळ आणि केवळ त्यांच्या पुढाकारामुळे आपल्याला हे वेगळेपण टिकवता आले आहे. त्यामुळे आता मोपा नामकरणाचा मुद्दा मिटणार की पेटणार हे येणाऱ्या काही दिवसात समजू शकणार आहे.

मोपा विमानतळ नामकरणावरुन वातावरण तापले

मोपा विमानतळ कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतल्यानंतर काही दिवसात मोपाचे उद्घाटन होणार असल्याचं स्पष्ट केले आहे. मात्र नाकरणाच्या मुद्द्यावरुन वेगवेगळे मतप्रवाह राज्यभरात तयार झाल्याने या मुद्यावरुन वातावरण तापले आहे.

काही राजकिय पक्षांनी नावासाठी तर काही ग्रामपंचायतींनी ही नावासाठी ठराव केले आहेत. यातच चर्चिल यांनी ही नवे नाव सुचवल्याने हा पेच कसा सुटणार हे पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT