Mopa Airport
Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : मोपा विमानतळ पठारावरील पाणी गावात घुसणार नाही : मंत्री शिरोडकर

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport :

मोरजी, आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ पठारावरून पावसाळ्यात वाहत येणारे पाणी यापुढे खाजने, अमेरे, पोरस्कडे गावाला यापुढे बाधा आणणार नाही.

यासाठी जलस्रोत खात्यातर्फे सुमारे सात कोटी अकरा लाख रुपये खर्च करून सुमारे सव्वा किलो मीटर लांबीची संरक्षण भिंत तसेच नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

अमेरे येथे या कामाचा श्रीफळ वाढवून तसेच नामफलकाचे अनावरण करून शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. शिरोडकर पुढे म्हणाले की, खाजने-अमेरे-पोरस्कडे परिसरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असल्याने आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने आज या कामाला सुरवात होत आहे. सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यास कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

शिरोडकर पुढे म्हणाले की, पाण्याचा योग्य उपयोग करण्यासाठी ओहोळावर बंधारे घालणे गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच, पंचांनी अभ्यास करून आपले प्रस्ताव आमदाराच्या मार्फत पाठवून द्यावे, जेणेकरून या पाण्याचा लाभ आपल्या गावातील नागरिकांना होईल.

त्यामुळे शेती बागायतींचाही विकास होईल. तसेच दुग्ध उत्पादनातही मोठा फायदा आहे. पंच, सरपंचांनी याबाबतही अभ्यास करावा व यासंदर्भात गावात जागृती घडवावी. सरकारच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ घ्या.

आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, या मोपा विमानतळ पठारावरील पाणी या भागात तीन ठिकाणी वाटा करून सोडण्यात येत होते त्यामुळे या भागातील शेती, बागायती मोठ्या प्रमाणात नष्ट होत होती.

मंदिरासह काही घरात पाणी घुसण्याचा प्रकार घडले. मातीचा भराव बागायती तसेच शेतात घुसल्याने जमीन नापिक झाली. मंत्री सुभाष शिरोडकर यांना याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी येथे संरक्षक भिंत व नाल्या बांधकामाला मान्यता दिली,असे ते म्हणाले.

पंच निशा हळदणकर यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन देवानंद गावडे यांनी केले. आभार सरपंच सुबोध महाले यांनी मानले.

पंच, सरपंचांना आवाहन

पंच, सरपंचांनी फक्त रस्ते, गटार, संरक्षण भिंती, फुटपाथ या विकास कामातच मग्न न राहता आठवड्यातील एक दिवस हा शिक्षण तसेच शेतीसाठी द्यावा. जेणेकरून शेती आणि शिक्षणाचाही विकास होईल. तसेच दूध व्यवसायाचा अभ्यास करा व लोकांत जागृती घडवून आणा, असे आवाहन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT