Mopa Airport  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: ‘मोपा’ देशातील चौथ्या क्रमांकाचे महागडे विमानतळ! तिरुअनंतपुरम पहिल्या क्रमांकावर; वाचा संपूर्ण यादी..

Mopa Airport Ranking: देशांतर्गत प्रवाशांसाठी महागडे विमानतळ श्रीनगर (प्रतिप्रवासी १०५०) आहे. आगमन आणि उड्डाणाच्या दृष्टीने जयपूर विमानतळ महागडे आहे. तेथे १२५० रुपये प्रतिप्रवासी आकारले जातात.

Sameer Panditrao

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील चौथ्या क्रमांकाचा महागडा विमानतळ ठरला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आगमन आणि उड्डाणासाठी प्रतिप्रवासी १७०० रुपये वापरकर्ता विकास शुल्क आकारले जाते.

देशातील सर्वांत महागडा आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुअनंतपुरम येथे आहे, जिथे प्रतिप्रवासी २,४०० रुपये आकारले जातात. केरळमधील कन्नूर विमानतळ हा केवळ आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी महागडा असून, प्रतिप्रवासी १,७९८ रुपये शुल्क आकारले जाते.

देशांतर्गत प्रवाशांसाठी महागडे विमानतळ श्रीनगर (प्रतिप्रवासी १०५०) आहे. आगमन आणि उड्डाणाच्या दृष्टीने जयपूर विमानतळ महागडे आहे. तेथे १२५० रुपये प्रतिप्रवासी आकारले जातात. मोपा आणि तिरुअनंतपुरम येथे शुल्क १२०० रुपये आहे.

वापरकर्ता विकास शुल्क म्हणजे काय?

प्रवाशांकडून विमानतळ प्राधिकरण किंवा कंपनी हे शुल्‍क वसूल करते. विमानतळाचे आधुनिकीकरण, नवीन सुविधा आणि देखभाल खर्चासाठी ते वापरले जाते. तिकीट खरेदी करताना बिलामध्‍ये स्वतंत्र घटक म्हणून ते शुल्‍क दिसते.

तिकीट दर ठरवण्यामागे कोणते घटक कारणीभूत

प्रवासाचा हंगाम, आठवड्याचा दिवस, सुट्टीचे दिवस, उड्डाणाची वेळ

तिकीट मागणी, उपलब्धता, इंधन दर, सुविधा शुल्क, स्पर्धक कंपन्यांचे दर

‘डायनॅमिक प्राइसिंग’ पद्धतीनुसार वेळोवेळी बदलतात दर

इतर महत्त्वपूर्ण विमानतळांवरील शुल्क

चंदीगड : १५५० रुपये

कोलकाता : १५४७ रुपये

बंगळूर/हैदराबाद : १५०० रुपये

जयपूर : १८०० रुपये

नवी मुंबई : १७५० रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नेपाळी नागरिकाचा गोव्यात संतापजनक प्रकार; दोन पाळीव कुत्र्यांना विष देऊन केले ठार

Delhi High Court Bomb Threat: तीन बॉम्ब ठेवलेत, थोड्याच वेळात फुटतील... दिल्ली उच्च न्यायालयाला धमकीचा मेल, पोलिस अलर्ट मोडवर

Rangoli: एक लाख रुपयांची 'रांगोळी', गोव्यात उंबरठ्यापलीकडे गेलेली कला

Rohit Sharma: वनडे रिटायरमेंटच्या चर्चेला पूर्णविराम! रोहित शर्माच्या VIDEO शेअर करत दिलं मोठं अपडेट

खरी, खोटी म्हणत अखेर MRF ने नोकर भरतीच केली रद्द; सिंधुदुर्ग मनसे जिल्हाध्यक्षांना E-Mail वरुन दिली माहिती

SCROLL FOR NEXT