Goa Monsoon News Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 1 जूनला मॉन्सून पोहोचणार!

हवामान खात्याकडून खूषखबर : चार दिवस आधीच लागणार पावसाची हजेरी

दैनिक गोमन्तक

पणजी : अंदमान-निकोबारमध्ये तब्बल पाच दिवस अगोदर पोहोचलेल्या मॉन्सूनचा हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातला प्रवास योग्य प्रकारे सुरू असल्याने केरळमध्ये तो 27 मे रोजी, तर गोव्यात नेहमीपेक्षा चार दिवस आधी म्हणजे 1 जूनलाच पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Monsoon to Arrive in Goa on June 1)

आतापर्यंतचा मान्सूनचा प्रवास लक्षात घेता बंगालच्या उपसागरातून मॉन्सून सुरू होतो आणि पुढे हिंदी महासागरातून पुढे सरकत विषुववृत्तावरील मादागास्कर बेटांना वळसा घालून परत भारताकडे वळतो. मॉन्सूनचा हा समुद्रातला प्रवास साधारणपणे 10 दिवसांचा असतो.

यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा पाच ते सहा दिवस आधीच समुद्रात सक्रिय झाला असून अंदमान निकोबार बेटांवर तो 16 मे रोजी सक्रिय झाल्याने पुढे त्याचा प्रवास त्याच गतीने सुरू आहे. त्यामुळे 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मॉन्सून यंदा प्रथमच 27 मे रोजी दाखल होणार असल्याचे अनुमान हवामान खात्याने केले आहे.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या मॉन्सूनसंदर्भातील अनुमानाला गेली अनेक वर्षे मॉन्सूनचा अभ्यास करणारे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. रमेशकुमार यांनीही दुजोरा दिला आहे.

राज्यात सरासरी पाच जूनला मॉन्सून दाखल होतो. यंदा अंदमान निकोबारपासूनची मान्सूनची सुरवात चार दिवस अगोदर झाली आहे. त्यामुळे राज्यातही तो चार दिवस अगोदर दाखल होईल, असे अनुमान आहे. - एम. राहुल, हवामान वैज्ञानिक, गोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT