आसानी चक्रीवादळाबाबत अलर्ट जाहीर केल्यानंतर पुरी (ओडिशा) येथे समुद्रकिनाऱ्यावरील बोटी पलटी करून ठेवण्यात आल्यात. Dainik Gomantak
गोवा

‘आसानी’मुळे गोव्यात मॉन्सून वेळेपूर्वी येण्याची शक्यता

परिणाम: चक्रीवादळाचा गोव्याला धोका नाही, ओडिशात अलर्ट

दैनिक गोमन्तक

पणजी: खंडीय प्रदेशात वाढलेली उष्णता आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘आसानी’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. गोवा वेधशाळेने सांगितले, की ‘आसानी’ वादळ पूर्व किनारपट्टीवर असल्याने राज्यात ढगाळ वातावरणाशिवाय त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, या चक्रीवादळामुळे यंदाचा मॉन्सून नियमित वेळेपूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे ‘आसानी’ चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ प्रतितास 16 किलोमीटर गतीने पश्चिम-वायव्य दिशेला सरकले. ते अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून 400 किलोमीटर, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून 940 किलोमीटर तर ओडिशातील पुरीपासून एक हजार किलोमीटरवर होते. येत्या 24 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढून त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याचा व ते वायव्य दिशेने सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याचप्रमाणे, ते उत्तर आंध्र प्रदेश व ओडिशा किनाऱ्यालगत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोचण्याची शक्यता आहे.

मॉन्सून निर्मितीची प्रक्रिया सुरू

‘आसानी’मुळे काही ठिकाणी अत्यंत तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात. ही स्थिती पुढील चार दिवस असेल. सध्या बंगालच्या उपसागरात मॉन्सून निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. या चक्रीवादळामुळे यंदाचा मॉन्सून नियमित वेळेपूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असे झाल्यास देशातील काही भागात या महिनाअखेरीस मॉन्सून दाखल होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT