Tambdi Surla Mahadev Temple Dainik Gomantak
गोवा

Tambdi Surla Mahadev Temple: नुकसान करताहेत माकडं मात्र भुर्दंड सोसताहेत गाडेधारक... नेमका काय प्रकार?

परिसरात कचरा होत असल्याने स्थानिक पंचायतीने गाडे धारकांना नोटीस पाठवून दंडात्मक कारवाईचा इशारा दिलाय

गोमन्तक डिजिटल टीम

Tambdi Surla Mahadev Temple साकोर्डा पंचायत यांनी तांबडीसुर्ला येथे असलेल्या 16 गाडे धारकांना कचरा करीत असल्याचे निमित्त धरून कारवाई करण्यासंदर्भात नोटीस बजावली असल्याने गाडे धारकांनी पंचायतच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

रोजगार नसल्याने व आर्थिक बाबतीत कमकुवत असल्याने पंचायतने आम्हाला दिलासा ध्यावा अशी मागणीही गाडे धारकांनी केली आहे.

धारबांदोडा तालुक्यातील तांबडीसुर्ला येथील जगप्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिराजवळ गाडे धारकांचा प्रश्न एरणीवर आला आहे. परिसरात कचरा होत असल्याने स्थानिक पंचायत मंडळाने गाडे धारकांना नोटीस पाठवून यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मात्र परिसरात असलेल्या रानटी मर्कट (खेती) रात्रीच्यावेळी कचरापेटीला कुलुप नसल्याने कचरापेटीतील कचरा बाहेर काढून अस्ताव्यस्त टाकत आहे, त्यामुळे हा परिसर विद्रूप होत असल्याची तक्रार घेऊन पंचायतने नोटीस पाठविल्याने गाडे धारक अडचणीत आले आहे.

स्थानिक पंचायत मंडळ व आमदारांनी या विषयाकडे लक्ष देऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आम्हाला दिलासा ध्यावा अशी मागणीही गाडे धारकांनी केली.

मंदिरात सुटीच्या दिवसात अधिक प्रमाणात पर्यटक येत असल्याने स्थानिक लोकांचा व्यवसाय तेजीत येतो. सुमारे 16 गाडे धारकांना पंचायतीने परवाना दिलेला आहे. पण त्यापैकी 7-8 जण व्यवसायात उतरले आहे.

परंतु परिसरात होणाऱ्या कचऱ्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. या गाडे धारकांच्या आवारात अधिक संख्येने असलेले वानर रात्रीच्यावेळी कुंड्यातील कचरा बाहेर टाकून देतात. सुमारे 50हून अधिक वानर या परिसरात वावरत असून त्यांचा त्रास पर्यटकांना सुद्धा होत आहे. त्यामुळे गाडेधारकांची डोकेदुखी वाढली आहे.

गाडेधारक असे म्हणतात:-

आनंद गांवकर यांनी सांगितले की या परिसरात साफसफाई करून आम्ही सर्व गाडेधारक कचरा कुंडीत टाकतात. तसेच हा परिसरही स्वच्छ ठेवतात पण पंचायत कचरा उचलण्यास उशीर करीत आहेत. दर आठवड्याला हा कचरा उचलला जावा तसेच कुलुप लावलेल्या कचरा पेट्या आम्हाला द्याव्यात अशी मागणीही गाडे धारकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT