Molestation of Woman in Goa Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संशयित कराटे प्रशिक्षक फरार

दैनिक गोमन्तक

पणजी : बार्देश तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिच्या कराटे प्रशिक्षकाविरुद्ध पणजी महिला पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी येत्या सोमवारी (30 मे) ठेवण्यात आली आहे. सध्या संशयित प्रशिक्षक फरारी असून त्याचा शोध सुरू आहे.

पणजी महिला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या घटनेप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ही मुलगी नेहमीप्रमाणे गेल्या महिन्यात कराटे प्रशिक्षणासाठी संशयितासोबत गेली होती. त्यावेळी संशयिताने तिच्याशी अश्‍लिल चाळे केले तसेच तिला मोबाईलवर अश्‍लिल चित्रफितीही दाखवल्या व तिचा विनयभंग केल्याचे म्हटले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी संशयिताचा त्याच्या राहत्या घरी शोध घेतला असता तो सापडला नाही. त्याच्याविरुद्ध भादंसं कलम 354 तसेच बाल कायद्याच्या कलम 8(2) व पोक्सो कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. त्याच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे अजामीनपात्र असल्याने त्याची अटक अटळ आहे.

दरम्यान, पीडित मुलगी सध्या या प्रकाराने घाबरलेली असल्याने तिची जबानी बिगर सरकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहे. ही घटना गेल्या महिन्यात घडली होती, मात्र तक्रार देण्यावरून मुलीचे कुटुंब दडपणाखाली होते. पण तो इतर मुलींनाही छळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अखेर धाडस करून पीडित मुलीच्या नातेवाईकांनी ही तक्रार दाखल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

SCROLL FOR NEXT