Modified Silencer Dainik Gomantak
गोवा

Modified Silencer: ‘मॉडिफाईड सायलेन्‍सर’ असणाऱ्या 4 दुचाकी जप्‍त! पर्वरी पोलिसांची धडक कारवाई; ‘धूम स्‍टाईल’ दुचाकीस्‍वारांना वेसण

Modified Bike Seized Goa: कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींमुळे समाजातील अनेक घटकांना त्रास होतो. ज्‍येष्‍ठ लोक आणि रुग्‍णांना तर खूपच त्रास होतो.

Sameer Panditrao

Modified Bike Seized Goa Porvorim

पर्वरी: ‘धूम स्‍टाईल’ दुचाकीस्‍वारांना वेसण घालण्‍यासाठी राज्‍यात पोलिसांनी ‘मॉडिफाईड सायलेन्‍सर’ असणाऱ्या दुचाकींवर कारवाई करण्‍यास प्रारंभ केला आहे. पर्वरी पोलिसांनी रेईश-मागूश व नेरुल पंचायत क्षेत्रातून चार दुचाकी जप्‍त केल्‍या आहेत.

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींमुळे समाजातील अनेक घटकांना त्रास होतो. ज्‍येष्‍ठ लोक आणि रुग्‍णांना तर खूपच त्रास होतो. त्‍यासाठी अशा दुचाकीचालकांवर कारवाई करण्‍याची मागणी सातत्‍याने होत आली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज्‍यभर मोहीम राबवण्‍यात येत आहे. महाराष्‍ट्रात ‘मॉडिफाईड सायलेन्‍सर’ बसवून देणाऱ्या मेकॅनिकवर कारवाई केल्‍याचीही उदाहरणे आहेत.

दरम्‍यान, पोलिसांनी कारवाई करण्‍यासोबतच शोधमोहीम कायम राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक, रुग्‍णांना कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींमुळे त्रास सहन करावा लागतो. त्‍यांचा जीव धोक्यात येतो. ‘मॉडिफाईड सायलेन्‍सर’मुळे वेगाने वाहन चालवण्‍याच्‍या प्रवृत्तीस चालना मिळते. पोलिसांनी ‘मॉडिफाईड’ दुचाकींवरील कारवाईत सातत्‍य राखावे, अशीही मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT