Mobor coast Dainik Gomantak
गोवा

Goa: मोबोर किनाऱ्यावरील ‘क्यू काऊंटर’ वॉटर स्पोर्ट्स चालकांकडून बंद

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यटन खात्याने मोबोर किनाऱ्यावर क्यू काऊंटर उभारला होता.

दैनिक गोमन्तक

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यटन खात्याने मोबोर किनाऱ्यावर उभारलेला क्यू काऊंटर (रांग काउंटर) काल जलक्रीडा चालकांनी बंद पाडला. हा काऊंटर उघडताना आम्हाला तसेच पंचायतीला विश्वासात घेतलेले नाही, असा दावा त्या चालकांनी केला.

दरम्यान, हा काऊंटर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने उघडला होता, स्थानकांनी तो बंद पाडल्याने आता त्याचा अहवाल न्यायालयाला सादर केला जाईल, असे पर्यटन खात्याचे उपसंचालक प्रदीप तेली यांनी सांगितले.

मोबोर किनारी जलक्रीडा चालक रांग पद्धत पाळत नाहीत, असा दावा करून एकाने याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने काऊंटरचा आदेश दिला होता.

आमदार व्हिएगस यांचा पाठिंबा

या जलक्रीडा चालकांना आमदार वेंझी व्हीएगस यांनी पाठिंबा देऊन ही पद्धत सुरू करण्यापूर्वी स्थानिक चालकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी करून पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्याशी बोलून तोडगा काढू, असे सांगितले. ओडलीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी चालकांना पाठिंबा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT