Mobor coast Dainik Gomantak
गोवा

Mobor coast: मोबोर समुद्रकिनाऱ्याची धूप; केळशी पंचायतीने वेधले लक्ष

गेल्या काही आठवड्यांपासून किनाऱ्याची धूप होत असल्याचे केळशी स्थानिकांच्या लक्षात आले.

दैनिक गोमन्तक

Mobor coast: केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल राज्यमंत्री भूपेंद्र यादव हे गोव्यात आले असताना केळशी पंचायतीचे सरपंच डिक्सन वाझ, पंचसदस्य जेसूस डिकॉस्ता यांनी त्यांची भेट घेऊन मोबोर समुद्रकिनाऱ्याची धूप होतेय त्याकडे त्यांचे लक्ष वेधले. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्य पर्यावरण मंत्री नीलेश काब्रालही उपस्थित होते.

या वेळी सरपंचांनी किनाऱ्याची धूप संदर्भात एक निवेदन केंद्रीय मंत्र्यांना दिले. ही धूप थांबविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून किनाऱ्याची धूप होत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. तसेच किनाऱ्यावर जाण्यासाठी काळ्या दगडाची जी पायवाट केली होती तीसुद्धा ढासळली असून दगड सर्वत्र पसरलेले दिसत आहेत.

केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने येथील किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना करावी. जर अशीच धूप यापुढेही होत राहिली तर समुद्रकिनाऱ्यानजीक असलेली स्थानिकांची घरे नष्ट होण्याची भीती आहे. जे परिसरातील झाडे कापून त्यांना आग लावतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी विनंती निवेदनात केली आहे.- डिक्सन वाझ, सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT