अतिशी यांनी या कृतीच्या वर्धापन दिनानिमित्त या आमदारांना काँग्रेस जनता पार्टी नावाचा केक पाठवण्याची घोषणा केली. Dainik Gomantak
गोवा

Goa: काँग्रेस आणि भाजपमधून आपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झालेल्या दहा आमदारांच्या पक्षांतरावर कडाडून टीका करत अतिशी यांनी या कृतीच्या वर्धापन दिनानिमित्त या आमदारांना काँग्रेस जनता पार्टी नावाचा केक पाठवण्याची घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा (Goa Assembly) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप पक्षाने (Aap party) विविध प्रकारचे फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आप च्या वतीने काँग्रेस (Congress) मधून भाजपमध्ये (BJP) पक्षांतर केलेल्या आमदारांना त्यांच्या कृतीच्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस जनता पार्टी या नावाचा केक पाठविण्याची घोषणा केली आहे. या केक अनावरण करताना आप पक्षाच्या नेत्या अतिषी यांच्या हस्ते करण्यात आले.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप ने आपली प्रचार यंत्रणा अधिक गतीमान करण्यावर भर दिला आहे. याबरोबरच विविध पक्षातून आपमध्ये दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले जात आहे. हे करताना सत्ताधारी भाजप विविध विकास कामांमध्ये कसा मागे पडला आहे ? हे सांगत काँग्रेसला मतदान हे भाजपला मतदान असल्याचे सांगत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना मतदारांनी दूर ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. काँग्रेसला केलेले मतदान हे भारतीय जनता पार्टी कडे जात असून काँग्रेस हे विकाऊ आणि भाजप हे खरेदीदार असल्याचा पुनरुच्चार आप पक्षनेत्या अतिशी यांनी पणजीत जवळच्या इंटरनॅशनल सेंटरमध्ये केला आहे. यावेळी काँग्रेस मधून पेडणे येथील विकेश असोटीकर यांनी तर कुठ्ठाळी येथून ज्युईल फर्नांडिस यांनी आप मध्ये प्रवेश केला. त्यांचे अतिशी कडून स्वागत करण्यात आले. यावेळी 20 मतदारसंघातील इनचार्ज यांची यादी जाहीर करण्यात आली. याच कार्यक्रमांमध्ये दोन वर्षापूर्वी काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झालेल्या दहा आमदारांच्या पक्षांतरावर कडाडून टीका करत अतिशी यांनी या कृतीच्या वर्धापन दिनानिमित्त या आमदारांना काँग्रेस जनता पार्टी नावाचा केक पाठवण्याची घोषणा केली.

दरम्यान, गोव्यात काँग्रेस आणि भाजपा एकच पार्टी आहे. गोव्यातील काँग्रेसचे नेते भाजपात जाऊन घाण राजकारण खेळत आहे. या सगळ्या राजकारणाला गोव्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेला बदल हवा आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी गोव्यात आपले जाळे फैलावत आहे. असे आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता आतिषी मारलेना यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT