Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: राजकारणी नव्हे तर केवळ जन आंदोलनच म्हादईला वाचवू शकेल!

आमदार विजय सरदेसाई यांचे प्रतिपादन; मुख्यमंत्र्यांना दिल्लीत काही किंमत नाही

Akshay Nirmale

Mahadayi Water Dispute: कर्नाटकमधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवुनच म्हादई संदर्भात निर्णय घेण्यात आला असुन भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांना त्यापासून फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी म्हादई प्रश्र्न सोडविण्यासाठी या दोन्ही पक्षांच्या राजकारण्यांवर विश्र्वास ठेवु नये. ते या प्रश्र्नाला न्याय देऊ शकणार नाहीत. केवळ जनआंदोलनच म्हादई वाचवू शकेल, असे प्रतिपादन फातोर्डेचे आमदार तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले.

आमदार सरदेसाई म्हणाले, या पुर्वी कोकणी भाषेला मान्यता, गोव्याचे अस्तित्व राखण्यासाठीचा ओपिनियन पोल केवळ जनआंदोलनामुळेच यशस्वी झाला व त्यातुन गोवा बचावला. त्याचप्रमाणे यावेळीही जनआंदोलनाची गरज आहे. साखळी येथे म्हादई जनजागृतीसाठी जो लढा पुकारलेला आहेत त्यात सहभागी होणार आहे. म्हादई गेली तर सर्वप्रथम साखळीलाच त्याचा जास्त त्रास सोसावा लागेल. स्थानिकांना केवळ नोकऱ्या देऊन व आर्थिक मदत देऊन भागणार नाही. जगायला पाण्याचीही अत्यंत आवश्यकता आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे.

आमदार सरदेसाई म्हणाले, मुख्यमंत्री ऊठसुठ केवळ विरोधी पक्षांना जबाबदार धरतात. या प्रश्र्नी विरोधी पक्ष काहीच करु शकणार नाही. जे करायचे आहे ते सरकारी पक्षाला करायचे आहे असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत महत्व नाही. त्यांना दिल्लीत कुणी गांभीर्याने घेत नाही. म्हणुच सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्र्नी सुनावणी झाली नाही. पंतप्रधान किंवा इतर केंद्रीय मंत्री मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत, म्हणुनच तर म्हादई गमावण्याची वेळ आली.

ते म्हणाले, भाजप सरकार सर्व नगरपालिकांना, पंचायतींना ठराव मंजुर करुन पाठविण्यास सांगत आहे. जर निवडणुकीपुर्वी डीपीआर रद्द झाला नाही तर निवडणुकीत पंचायत व नगरपालिकांना भाजप विरोधात मते घाला असे सांगणार आहात का, असा प्रश्र्नही सरदेसाई यांनी केला. उद्या सकाळी 11 वाजता विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असुन या बैठकीत विधानसभा अधिवेशन 18 दिवसांचे करण्याची मागणी करणार आहे. चार दिवसांमध्ये कुठलेही कामकाज पुर्ण करता येणार नाही. शिवाय म्हादईचा प्रश्र्न गंभीर आहे. म्हादई संदर्भातील ठराव विधानसभेत मांडुन मंजुर करुन घ्यायला पाहिजे, असेही सरदेसाई यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

निवृत्तीआधी रोहित शर्मानं पूर्ण करावं 'हे' मोठं टार्गेट; गावस्करांचा हिटमॅनला मोलाचा सल्ला, म्हणाले- "आता जबाबदारी समजून खेळ..."

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

SCROLL FOR NEXT