Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: हवं तर घरी जाऊन माफी मागतो, पण... विजय सरदेसाईं यांची सभापती तवडकर यांना विनंती

लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनाचा वेळ वाढवून देण्याची मागणी

Akshay Nirmale

Vijay Sardesai: मी सभापती रमेश तवडकर यांचा अपमान केलेला नाही. तरीही त्यांना त्यांचा अपमान झाला असे वाटत आहे तर त्यांच्या घरी जाऊन माफी मागण्याचीही माझी तयारी आहे, पण कृपा करून अधिवेशनाची वेळ वाढवा. लोकांचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला रोखू नका, अशी विनंती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

हिवाळी अधिवेशन फक्त चार दिवसांचे केल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने सभापतींना आपला नोकर समजू नये, असे वक्तव्य सरदेसाई यांनी केले होते. त्याला अनुसुचित जमाती (एसटी) मोर्चाने हरकत घेत सरदेसाई यांनी सभापतींचा अपमान केला असून त्यांनी 48 तासात त्यांची माफी न मागितल्यास सरदेसाई यांच्या घरासमोर धरणे धरण्याचा इशारा दिला होता.

सरदेसाई म्हणाले की, मी सभापतींना सरकारचे कर्मचारी कधीच म्हटले नाही. उलट सरकारने त्यांना आपला कर्मचारी समजू नये असे म्हटले होते. असे असतानाही सभापतींना तो अपमान वाटत असेल तर त्यांची माफी मागण्यात मला काहीच हरकत नाही. फक्त माझे म्हणणे एव्हढेच आहे, सरकारकडे संख्याबळ असल्याने त्यांना काय हवे ते निर्णय घेऊ द्या, पण विरोधकांना निदान प्रश्न तरी मांडू.

आपण एसटींच्या विरोधात नाही. उलट सभापती तवडकर हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इश्चा आहे. कारण ते प्रमोद सावंत यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत असे सरदेसाई म्हणाले. मात्र हे सरकार त्यांच्या कार्यालयाचा दुरूपयोग करून विरोधकांचा आवाज दाबू पाहतात, याबद्दल मला खंत वाटते, असे सरदेसाई म्हणाले.

पावसाळी अधिवेशन निवडणुकीचे निमित्त करून 25 दिवसावरून 10 दिवसांवर आणले. त्यावेळी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी अधिक असेल असे आश्वासन दिले होते. पण हे अधिवेशन चारच दिवसांचे करत खासगी कामकाजाचा दिवसही कपात करण्यात आला. मी एसटी समाजाच्या विरोधात नाही उलट शुक्रवारी मला एसटीना राजकीय आरक्षण देण्यासाठी खाजगी विधेयक आणायचे होते. पैसे देऊन विकणाऱ्या सरकारी नोकऱ्या, म्हादईचे पाणी कर्नाटक पळवते आहे, गरीबांसाठीचे धान्य कर्नाटकात विकले जाते, हे प्रश्न एसटी मोर्चाला पडत नाहीत का? असा सवाल सरदेसाई यांनी केला.

सध्याचे सरकार सालाझार प्रमाणे वागतात. हे सरकार झुआरी पुलावर लोकांना सेल्फी काढायला देऊन दुसऱ्या बाजूने रूग्णवाहिकेत अडकलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात घालणारे आहे. त्यावर विरोधकांनी आवाज उठविल्यावर त्यांना ते पसंत पडत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT