Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai on Goa Govt: ''मुख्यमंत्र्यांनी खाण कामगारांचा विश्वासघात केला''

खाण बाधितांना रस्त्यावर उतरण्याचे विजय सरदेसाई यांचे आवाहन

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात खाणीचा लिलाव झाल्यावर पूर्वी ज्या खाण कामगारांची नोकरी गेली होती, त्यांना नव्या कंपन्यांनी नोकरीवर घेणे बंधनकारक केले जाईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांनी दिलेले आश्वासन हे फक्त पोकळ असल्याचे खाण संचालकानी नुकत्याच केलेल्या निवेदनावरून स्पष्ट झाले आहे. असा आरोप गोवा फॉरवर्डने आज केला आहे.

(MLA Vijay Sardesai criticized the Goa government over the employment of mine workers )

खाण संचालकानी नवीन कंपन्यांना पूर्वीच्या कामगारांना नोकऱ्या देणे बंधनकारक नाही असे वक्तव्य केले आहे. ते पाहता मुख्यमंत्री सावंत यांनी पूर्वी दिलेल्या आश्वासन हे केवळ थाप होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विश्वासघात केला आहे असा आरोप गोवा अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

खाण संचालकानी काल एक निवेदन केले असून त्यात नव्याने लिलावात खाणी घेणाऱ्या कंपन्यांना पूर्वीच्या कंपन्यातील कामगारांना कामावर घेणे बंधनकारक नसेल मात्र त्यांनी त्या कामगारांना शक्यतो घेण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले होते.

याचा समाचार घेताना सरदेसाई म्हणाले, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांनी या खाण कामगारांना नव्या नव्या कंपन्यात नोकरी देणे बंधनकारक करणार असे म्हटले होते आणि त्यावरून लोकांची मते घेतली होती.

आज हेच सरकारचे खाण संचालक वेगळी भाषा बोलतात. त्यावरून या सरकारला खाण बाधितांचे काहीच वाटत नाही हे सिद्ध झाले आहे. याच लोकांनी 2012, 2017 व 2022 असे तीन वेळा भाजपाला जिंकवून दिले होते हे सरकार विसरले आहे. आज त्याच लोकांच्या पोटावर हे सरकार उठले आहे अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

काँग्रेसमधून आठ आमदार भाजप पक्षात सामील झाल्यानंतर या सरकारला आता आपले कुणीच वाकडे करू शकत नाही असे वाटत असून त्यामूळे त्यांना माज चढला आहे. त्यांना तीनवेळा सत्तेवर आणणाऱ्या खाण पट्ट्यातील लोकांचे काहीही वाटत नाही. त्यामुळे आता या खाण बधितांनी सरकार विरोधात रस्त्यावर येण्याची गरज सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT