Goa Congress Loksabha 2024 | manikrao thakre | vijai sardesai | Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: दक्षिणेत सार्दिन यांची उमेदवारी मान्य नाही, सरदेसाईंच्या भूमिकेने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी

Goa Congress Loksabha 2024: दक्षिणेचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या उमेदवारीबाबत सरदेसाईंनी नकारात्मक मत व्यक्त केले.

Pramod Yadav

Goa Congress Loksabha 2024

गोव्यातील दोन जागेवर उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस बराच वेळ घेत आहे. शुक्रवारी काँग्रेसने जाहीर केलेल्या 39 उमेदवारांच्या पहिल्या यादीत गोव्याचा समावेश नव्हता. पण, येत्या 3 ते 4 दिवसात गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली.

इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या गोव्यात झालेल्या बैठकीत पाच पक्षांनी हजेरी लावली होती. सर्वांनी भाजप विरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार केला. दरम्यान, काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि आमदार विजय सरदेसाई यांच्यात आज (09 मार्च) महत्वपूर्ण बैठक झाली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे आणि आमदार विजय सरदेसाई यांच्यातील ही पहिलीच तरीही महत्वपूर्ण बैठक होती. पणजीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक झाली. काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली.

काँग्रेसने दक्षिण गोव्याची उमेदवारी कोणाला द्यावी हे आपण सांगू शकत नाही. पण, उमेदवारी कोणाला दिल्यास काय वाईट होऊ शकत याबाबत मी काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांना सांगितल्याचे सरदेसाई म्हणाले.

याच बैठकीत दक्षिणेचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या उमेदवारीबाबत सरदेसाईंनी नकारात्मक मत व्यक्त केले.

काँग्रेसने फ्रान्सिस सार्दिन यांना दक्षिण गोव्याची उमेदवारी दिल्यास मला मान्य नाही या भुमिकेवर आपण ठाम असल्याची स्पष्ट भूमिका विजय सरदेसाई यांनी मांडली.

तसेच, दक्षिणेत भाजप जर महिला उमेदवार देत असेल तर चांगली बाब आहे. पण पुरुष उमेदवारावर एकमत होत नसल्याने महिलांचा विचार होत असेल तर ते चुकीचे असल्याचे देखील सरदेसाई यांनी प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट केल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

गोव्यात काँग्रेससोबत आप, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्घव ठाकरे) हे पक्ष आहेत. दक्षिणेत विजय सरदेसाई यांची भूमिका महत्वाची मानली जाते. दरम्यान, सरदेसाई यांनी सार्दिन यांच्या उमेदवारी मान्य नसल्याचे म्हटल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT