Karnataka Elections Dainik Gomantak
गोवा

Karnataka Assembly Elections 2023: आमदार तुयेकर यांच्याकडे भटकळ मतदारसंघाची जबाबदारी

कर्नाटकात भाजपला वाढता पाठिंबा

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Elections कर्नाटकात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे आमदार उल्हास तुयेकर यांच्याकडे भटकळ मतदारसंघात निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे.

आज भाजपचे उमेदवार सुनील बी. नाईक यांनी पाच हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निर्वाचन अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

यावेळी भाजपचे निरीक्षक उल्हास तुयेकर, जिल्हा सदस्य परेश नाईक व गोवा टीमचे इतर सदस्य उपस्थित होते.

भटकळ मतदारसंघात सुनील बी. नाईक हे एकवेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. यंदा ते दुसऱ्यांदा कर्नाटकात विधानसभा निवडणूक लढवित आहेत. आपण पक्षाचे निवडणूक निरीक्षक म्हणून गेले दोन दिवस भटकळ मतदारसंघात होतो.

आपण विधानसभा निवडणुकीबाबत सुनील नाईक यांच्याशी सखोल चर्चा केली आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून निवडणुकीचा आढावा घेतलेला आहे.

या मतदारसंघात भाजपला अनुकूल वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशभरात केलेला बहुमूल्य विकास जनतेच्या नजरेसमोर आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपला लोकांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे तुयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT