Krishna Salkar Dainik Gomantak
गोवा

MLA Krishna Salkar: बायणा, खारीवाडा समुद्र किनाऱ्याचे रूपडे पालटणार

बायणा किनारा एक मॉडेल करण्यासाठी आपले प्रयत्न करणार

दैनिक गोमन्तक

वास्को: बायणा व खारीवाडा समुद्र किनाऱ्यांचे जतन करताना त्या किनाऱ्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. बायणा किनारा एक मॉडेल करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. यासंबंधी येत्या दोन तीन दिवसांमध्ये पर्यटन मंत्र्याची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(MLa said Krishna Salkar will do baina beach and kharewada beach beautification)

पर्यटन खात्याच्या काही अधिकाऱ्यांसमावेत आमदार साळकर यांनी सोमवारी सकाळी बायणा किनाऱ्यांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमावेत नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज, नगरसेवक रामचंद्र कामत होते.

खारीवाडा किनाऱ्याची पाहणी करताना त्यांच्यासमावेत माजी नगराध्यक्ष लविना डिसोझा, माजी नगराध्यक्ष फियोला रेगो, माजी नगरसेवक आर्नाल्ड रेगो होते. पाहणीच्या वेळी साळकर यांनी सूचना करताना साळकर म्हणाले की, बायणा किनारा एक मॉडेल तयार करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे. त्याद्दष्टीने आम्ही तयारी सुरु केली आहे.

बायणा किनाऱ्यावर तात्पुरत्या स्वरुपात विकास करण्याऐवजी कायमस्वरूपी विकासकामे व्हावीत यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे खारीवाडा येथील किनाऱ्याची दुर्दशा झाली आहे. तेथे अस्वच्छता पसरली आहे. किनाऱ्याची स्वच्छता करण्याची सूचना आपण केली आहे. तेथे सुशोभीकरण करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT