MLA Pravin Arlekar Dainik Gomantak
गोवा

MLA Pravin Arlekar यांची सरकारी कार्यालयांना अचानक भेट

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बुधवारी पेडणे सरकारी संकुलातील विविध सरकारी कार्यालयात अचानक भेट देऊन पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बुधवारी पेडणे सरकारी संकुलातील विविध सरकारी कार्यालयात अचानक भेट देऊन पाहणी केली. आर्लेकर यांनी प्रथम उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांच्यासह ते येथील विविध कार्यालयांत फिरले.

मामलेदार, गटविकास, सार्वजनिक बांधकाम खाते इमारती विभाग आदी कार्यालयात त्यांनी पाहणी केली. यावेळी काही कार्यालयात कर्मचारीवर्ग दिसला नाही. काही कार्यालये नव्या जागेत स्थलांतरित का केली नाहीत याची आमदारांनी विचारणा केली.

त्यावर उपजिल्हाधिकारी वायंगणकर यांनी पुढच्या आठवड्यात ही कार्यालये स्थलांतरित होतील, असे सांगितले. आमदार सरकारी संकुलात आल्याची माहिती मिळाल्यावर कर्मचाऱ्यांत धावपळ उडाली.

दरम्यान, स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लोकप्रतिनिधी या नात्याने आपणाला भाषण करण्यास न मिळाल्याने तसेच झेंड्याची दोरी वेळी न सुटल्याने आर्लेकर यांनी उपजिल्हाधिकारी वायंगणकर यांच्याकडे विचारणा केली.

तसेच यापुढे तालुक्यात कोणताही सरकारी कार्यक्रम झाल्यास स्थानिक आमदार या नात्याने आपल्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असे सुचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT