Minister Nilesh Cabra And MLA Pernem Pravin Arlekar  Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral : ए प्रवीण, डेप्युटी कलेक्टर खबर ना कोण तो? आ..! लाय मरे ताका फोन’

दैनिक गोमन्तक डिजिटल

Nilesh Cabral: ''ए प्रवीण, डेप्युटी कलेक्टर खबर ना कोण तो? आ...लाय मरे ताका फोन'' अशा जरबेच्या भाषेत साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याशी संवाद साधला.

या संभाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर बराच व्हायरल झाला आणि त्याने खळबळ उडवून दिली. पेडण्यातील बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री काब्राल यांनी बुधवारी चांदेल पाणी प्रकल्पाला भेट देऊन तालुक्यातील दोन्ही आमदार आणि सरपंच, उपसरपंच यांच्याशी संवाद साधून पाण्याची समस्या सोडवण्याबाबत चर्चा केली.

आर्लेकर माझे मित्र : काब्राल

यावेळी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या नीलेश काब्राल यांच्या ‘त्या’ व्हिडिओविषयी काही पत्रकारांनी छेडले असता, प्रवीण आर्लेकर हे माझे खास मित्र आहेत.

कधी ते मला काहीतरी बोलतात, कधी मी त्यांना बोलतो. मित्रांमध्ये हे होतच असते, असे सांगून मंत्री काब्राल यांनी या विषयावर पडदा टाकला.

अपमानास्पद वागणूक; साबांखा मंत्र्यांचा निषेध

मंत्री काब्राल यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा पेडणे तालुका नागरिक समितीने निषेध केला. या विषयावर चर्चा करण्यासाठी समितीतर्फे 6 रोजी संध्याकाळी 4 वाजता बैठक घेण्यात येणार आहे.

काब्राल यांनी माफी मागावी, यासाठी पेडणे उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष भारत बागकर यांनी कळविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT