Michael Lobo On Anjuna Tourist Attack Dainik Gomantak
गोवा

Michael Lobo : दिल्लीतील पर्यटकांवर गोव्यात सूरी हल्ला झाल्यानंतर कळंगुटचे आमदार मायकल लोबो काय म्हणाले?

अशा घटनांमुळे गोव्याचे नाव संपूर्ण देशभरात खराब होत आहे

Kavya Powar

Michael Lobo On Tourist Attack : हणजूण येथील खासगी हॅटेलमध्ये उतरलेल्या पर्यटकांवर स्थानिक तरुणांकडून झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याच्या कारणावरून म्हापसा पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाने गोव्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात खळबळ माजवली. संपूर्ण देशभरात याची दखल घेण्यात आली. आता यावर मंत्री मायकल लोबो यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गोवा पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षित ठिकाण

पत्रकारांशी संवाद साधताना लोबो म्हणाले की, या आधीही पर्यटक आणि स्थानिक लोकांमधील भांडणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटना ताबडतोब थांबल्या पाहिजेत. यामुळे गोव्याचे नाव संपूर्ण देशभरात खराब होत आहे.

गोवा हे पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षित ठिकाण आहे. इथे पर्यटकांना देवासमान मानले जाते. हणजूण हल्ला प्रकरणात मी कुणाचीही बाजू घेणार नाही. यामध्ये दोन्ही पक्षांची चूक आहे. मात्र सुरुवात पर्यटकांनी केली होती.

मी नेहमी सांगत असतो की, स्थानिक लोकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये अडकू नये. भले चूक कोणाचीही असेल, पण या सगळ्यामुळे नाव आपल्या गोव्याचेच खराब होते.

प्रत्येकवेळी पोलिसांना दोष देणे चुकीचे...

आता ते पर्यटक त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकाच्या अंगावर टाके आहेत, मात्र त्यांच्या जिवाला कोणताही धोका नाही. म्हणूनच ते त्यांच्या ठिकाणी परतले आहेत.

या सगळ्यामध्ये पोलिसांवर आणि त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. यावर लोबो म्हणाले की, 'गोव्यात काहीही झाले की प्रत्येक वेळी पोलिसांना दोषी ठरवले जाते. मात्र असे करणे चुकीचे आहे. वाद, भांडणे आपण करायची आणि दोष पोलिसांना द्यायचा? घटना घडल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत FIR दाखल केली आणि आरोपींना ताब्यात घेण्यासही सुरुवात केली.

पर्यटक गोव्यात येऊन मनमानी करतात

यावर लोबो म्हणाले की, आपण बघतो देशी पर्यटक गोव्यात येतात, हॉटेल्स-बारमध्ये दारू पितात आणि स्थानिकांशी भांडणे करतात. त्यामुळे पर्यटकांनीही इथल्या नियमांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.

दरम्यान, बुधवारी या प्रकरणातील पाचव्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी खोर्ली-म्हापसा येथील सलीम कासीम खान (41) याच्या मुसक्या आवळल्या. संशयित सलीम खान म्हापसा-पणजी हमरस्त्यावरून जात असताना म्हापसा पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT