MLA Disqualification Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification: आमदार अपात्रता सुनावणीची तारीख पे तारीख

अंतिम सुनावणीची तारीख आली समोर

गोमन्तक डिजिटल टीम

MLA Disqualification: काँग्रेसच्या आजी - माजी प्रदेशाध्यक्षांनी वेगवेगळ्या आमदार अपात्रता याचिका सादर केल्या आहोत. एकाच मुद्द्यावर बहुयाचिका सादर करणे योग्य नाही. त्यांच्या याचिकेच्या आधी सादर झालेल्या इतर याचिकांवरील सुनावणी सुरू आहे.

त्यामुळे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची याचिका सुनावणीसाठी घेण्याबाबत वेळमर्यादाचे बंधन घालण्यात येऊ नये, असे उत्तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या त्या आठ फुटीर आमदारांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केले आहे.

ही याचिका अंतिम सुनावणीसाठी येत्या 24 मार्चला ठेवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यात आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी 30 दिवसांत पूर्ण करणे गरजेचे आहे.

याचिकादारा गिरीश चोडणकर यांनी आमदार अपात्रता याचिका सभापतींसमोर दाखल केली आहे मात्र चार महिने उलटून गेले तरी अजून प्रतिवादी असलेल्या आमदारांना नोटीसही बजावण्यात आलेली नाही.

त्यामुळे ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ती 30 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने द्यावेत यापुरतीच ही याचिका मर्यादित आहे.

सुनावणीला आधीच उशीर झालेला आहे त्यासाठी ती लवकरात घेऊन ती पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे अशी बाजू याचिकादाराचे वकील अभिजीत गोसावी यांनी मांडली.

मागील सुनावणीवेळी सभापतींनी नोटिसीला उत्तर दिले होते तर त्या फुटीर आठ आमदारांनी उत्तर सादर करण्यासाठी आजपर्यंत मुदत वाढवून घेतली होती.

त्यानुसार आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, रुदॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा व संकल्प आमोणकर यांनी वेगवेगळी प्रतिज्ञापत्रे सादर केली असली तरी दिलेल्या स्पष्टीकरणात साम्य आहे.

सभापतींसमोर आमदार अपात्रताप्रकरणाची अनेक प्रकरणे सुनावणीसाठी प्रलंबित असून त्यावरील सुनावी सुरू झालेली आहे.

त्यामुळे उच्च न्यायालयाने सभापतींना गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवरील सुनावणी निश्‍चित वेळेत पूर्ण करण्याचा निर्देश दिल्यास तो अन्यायकारक ठरणार आहे. याचिकादाराची याचिका सभापतींसमोर रांगेत आहे. त्यापूर्वीच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT