rabies free Goa Dainik Gomantak
गोवा

Mission Rabies: गोवा सरकारचे मिशन 'रेबीज हटाओ!' जनजागृतीसह राबवणार लसीकरण मोहीम

Goa Mission Rabies: मिशन रेबीज आणि पशुसंवर्धन तसेच पशुवैद्यकीय सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे

Akshata Chhatre

बार्देश: गोवा सरकारकडून बार्देश तालुक्यात रेबीज या जीवघेण्या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी मोठी लसीकरण आणि प्रशिक्षण मोहीम सुरू केली जाणार आहे. मिशन रेबीज आणि पशुसंवर्धन तसेच पशुवैद्यकीय सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्रीराम विद्या मंदिर शाळा परिसर, कोलवाळ येथे होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ पार पडेल.

गोवा हे राज्य रेबीज-नियंत्रित राज्य म्हणून अधिसूचित केले गेले असले तरीही काही भागांमध्ये अजूनही रेबीजची लागावण झाल्याचे दिसून आले आहे आणि म्हणून या रोगाला मुळापासून नष्ट करण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये बार्देश तालुक्यात तीन रुग्ण आढळले होते आणि त्यामुळे या मोहिमेच्या माध्यमातून बार्देशमधून रेबीजचा प्रसार रोखण्यात यश मिळेल, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी होणाऱ्या या उद्घाटन कार्यक्रमात लहान मुलांची रॅली, डिजिटल जनजागृती, डॉगी फ्लोट परेड, पथनाट्ये आणि डॉगी डान्स यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. मिशन रेबीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लूक गॅम्बल देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी होईल आणि त्यानंतर शैक्षणिक उपक्रम सुरु होतील. लसीकरण आणि निर्जंतुकीकरण मोहीम २४ फेब्रुवारीपासून सुरू होऊन २८ फेब्रुवारीपर्यंत चालेल. मोहीमेअंर्गत काम करणारी लसीकरण पथके सकाळी ६:३० ते ११:३० आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत काम करतील. या मोहिमेत सुमारे १५०० लोक सहभागी होणार आहेत, ज्यात ३२ लसीकरण पथके, ५ शिक्षण पथके आणि एक सर्वेक्षण पथक असेल. आंतरराष्ट्रीयस्थरावर देखील पशुवैद्य आणि विद्यार्थी देखील या प्रयत्नात सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral video: चालत्या कारच्या छतावर चढले अन्… तरुणांचा धोकादायक स्टंट व्हायरल; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

BCCI Election: बीबीसीआयच्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनचा मतदार असणार का? शनिवारी होणार निर्णय

गोव्यात असणाऱ्या परराज्यांतील कंपन्यांनी येथेच मुलाखती घेऊन स्थानिकांना रोजगारास प्राधान्य द्यावे; CM सावंतांचे यार्वीच निर्देश

Goa Rain: गोव्यात पावसाची दमदार वापसी! विजांचा कडकडाट, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

England T20 World Record: अशक्य ते शक्य! इंग्रजांनी टी-20 मध्ये केल्या 300 धावा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वविक्रमाची नोंद, पाहा Highlights

SCROLL FOR NEXT