Misappropriation of Rs 17.66 lakhs was detected from the amount collected as SOPO tax from vendors at Festa Fair in Margao 
गोवा

Margao Municipality: सोपो करातील गैरवापर उघडकीस; कुतिन्होंकडून चौकशीची मागणी

गैरवापर झालेल्या रकमेची चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस नेते आणि शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Municipality: हल्लीच मडगावात जुन्या बाजारात झालेल्या फेस्त फेरीतील विक्रेत्यांकडून सोपो कर म्हणून गोळा केलेल्या रकमेपैकी १७.६६ लाख रुपयांचा गैरवापर झाल्याचे उघडकीस आले आहे. या गैरवापर झालेल्या रकमेची चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस नेते आणि शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केली आहे.

फेस्त फेरीतून आलेल्या रकमेची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी कुतिन्हो यांनी माहिती हक्क कायद्याखाली अर्ज केला आहे. या गैरवापर झालेल्या रकमेची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच नगरविकास मंत्री विश्र्वजीत राणे यांनी चौकशी करावी, अशी मागणीही कुतिन्हो यांनी केली आहे.

सध्या मुख्याधिकारी हे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या व भारतीय जनता पक्षाच्या सरकारमागे ढालीप्रमाणे उभे आहेत व त्यांच्या सर्व गैरकारभाराकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. हल्लीच त्यांनी कॉंग्रेसला लोहिया मैदानावर बैठक घेण्यास परवानगी नाकारली. तसेच अगदी मोडकळीस आलेल्या इमारतीत चपलाच्या शोरूमला बेकायदेशीररीत्या परवाना दिला. या घटना त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे कुतिन्हो यांचे म्हणणे आहे.

फेस्त फेरीच्या वेळी नगरपालिकेतील त्या कर्मचाऱ्याने विक्रेत्यांकडून सोपो गोळा केला. त्यावेळी त्याने ती रक्कम आपल्या ‘गुगल पे’वर भरण्यास सांगितली व ती रक्कम नगरपालिकेच्या खात्यात जमा करण्याऐवजी आपल्या वैयक्तिक खात्यात जमा केली. अधिकृत माहितीप्रमाणे, २९२ स्टॉलांना परवाना देण्यात आला होता. सोपोद्वारे जी रक्कम गोळा करण्यात आली ती २७.६६ लाख रुपये एवढी आहे. यासंदर्भात माहिती हक्क कायद्याखाली संपूर्ण माहिती मागितल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार'ला घाबरून विद्यार्थी घरात, शाळेत गेलेच नाहीत; तोरसे, पत्रादेवी येथे पुन्‍हा बागायतींत मुक्त संचार

Virat Kohli Gautam Gambhir Controversy: विराट-गंभीरमध्ये पुन्हा बिनसलं? ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ पाहून चाहते चक्रावले! Watch Video

Goa Factory Fire: नेसाई औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीला भीषण आग! अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचली 10 लाखांची मालमत्ता; मोठा अनर्थ टळला

Horoscope: पैशांचा पाऊस! डिसेंबर महिना 'या' 4 राशींसाठी लकी; प्रत्येक इच्छा पूर्ण होणार, धनलाभ निश्चित

Goa ZP Elections: 'कमळ' फुलवण्यासाठी 'त्रिसूत्री' रणनीती! मित्रपक्ष मगोसह अपक्षांनाही संधी; मुख्यमंत्र्यांना विजयाची खात्री

SCROLL FOR NEXT