Margao Court Order Dainik Gomantak
गोवा

17 वर्षांच्या मुलीसोबत शारीरिक संबंध, पीडितेची तरुणाच्या सुटकेस ना-हरकत; ‘प्रेमसंबंधा’चा उल्लेख करत पॉक्सो संशयिताला जामीन

Panaji court: अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला पणजी येथील फास्ट ट्रॅक विशेष (पॉक्सो) न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला पणजी येथील फास्ट ट्रॅक विशेष (पॉक्सो) न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. संशयित व पीडिता यांच्यात ‘प्रेमसंबंध’ होते आणि पीडितेने संशयिताच्या सुटकेस हरकत घेतलेली नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले.

संशयिताला २२ सप्टेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. तक्रारीनुसार, मार्च ते जून २०२५ या कालावधीत युवकाने १७ वर्षे ६ महिन्यांच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. ही तक्रार पीडित मुलीच्या आईने दाखल केली होती. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४ तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ मधील कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील अर्चना भोबे यांनी तीव्र विरोध नोंदवला. त्यांनी असा दावा केला की, हा गुन्हा ‘अमानवी व नैतिकदृष्ट्या निंदनीय’ असून, संशयिताला सोडल्यास तो पीडितेला, तिच्या कुटुंबाला किंवा साक्षीदारांना धमकावू शकतो.

तक्रारदाराच्या मुलीला सध्या आश्रयगृहात ठेवण्यात आले असून, गर्भपातातून मिळालेला गर्भ डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, अध्यक्षीय अधिकारी दुर्गा मडकईकर यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर संशयितास सशर्त जामीन मंजूर करण्यास पात्र ठरवले.

तक्रार दाखल करण्यात उशीर

आदेशात नमूद केलेल्या प्रमुख कारणांमध्ये पीडितेने स्वतः अर्जास समर्थन दर्शवून कोणतीही हरकत घेतलेली नाही, संशयित व पीडिता यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे बचाव पक्षाचे म्हणणे, तक्रार दाखल करण्यात उशीर झाला असून ती मुलगी वयात आल्यानंतरच तक्रार दिली गेली, प्रकरणातील तपास जवळपास पूर्ण झाला आहे आणि पीडितेच्या भावाविरुद्धही अशाच स्वरूपाचा स्वतंत्र गुन्हा बाल न्यायालयात प्रलंबित असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

Devachi Punav: तरंगांची होणारी शारदीय चंद्रकळेच्या आल्हाददायक प्रकाशातली भेटाभेट, ‘देवाची पुनाव'

SCROLL FOR NEXT