Minor Girl  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

Minor Girl Kidnapped Margao: मडगावातील खारेबांध परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

Manish Jadhav

मडगाव: मडगावातील खारेबांध परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी तात्काळ मडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (15 नोव्हेंबर 2025) संध्याकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या अल्पवयीन मुलीला एका अज्ञात व्यक्तीने खारेबांध परिसरातून पळवून नेले.

गुन्हा दाखल आणि तपास

दरम्यान, या तक्रारीनंतर मडगाव (Margao) पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत अपहरणकर्त्याविरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी हा गुन्हा संबंधित कायद्यांच्या कलमांखाली दाखल केला. भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच, गोवा बाल कायदा कलम 8 (2) नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संजय वेळिप हे करत आहेत.

पोलिसांकडून शोध मोहीम सुरु

अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले. अज्ञात आरोपी (Accused) आणि अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, जर या मुलीबद्दल किंवा आरोपीबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित मडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT