Vishwajit P RANE in Sanguem Dainik Gomantak
गोवा

Prashasan Tumchya Daari : सरकारमधील घटकांनी जनतेत मिसळून कामे करावीत : मंत्री विश्‍वजीत राणे

आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगे दौरा केला

दैनिक गोमन्तक डिजिटल

जनतेचे प्रश्न सुटावे म्हणून ‘प्रशासन तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. सरकारमधील घटकांनी जनतेत मिसळून लोकांची कामे करावी, म्हणून हा प्रयत्न आहे.

गोव्यात होणारा विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागला असून स्थानिक पातळीवरही गतीने विकास होत आहे,असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगे पालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात केले.

‘प्रशासन तुमच्या दारी’ अंतर्गत आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगे दौरा केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसह पंचायत मंडळ, पालिका मंडळाच्या कैफियती जाणून घेतल्या. त्या नंतर सांगे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन नव्या इमारतीच्या कामाची पहाणी केली व शेवटी वन अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

मंत्री राणे म्हणाले की, राज्यातील जनतेला मोफत आरोग्य सेवा देणारे एकमेव गोवा राज्य आहे. राज्यात उद्‍भवलेली आगीची समस्या संपवण्यात तरुणांनी पुढाकार घेतला, त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

व्यासपीठावर माजी आमदार वासुदेव गावकर, जि.पं. सदस्य सुरेश केपेकर, नगराध्यक्ष प्रीती नाईक, उपजिल्हाधिकारी महिमा मदन, मामलेदार गौरव गावकर, डॉ. बांदेकर आदी मान्यवर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बंगळूरुतील अजब प्रकार! भररस्त्यात गादी टाकून झोपला तरुण; वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

राशीनुसार रंग परिधान केल्यानं होईल फायदा, देवी करेल मनोकामना पूर्ण; तुमचा Lucky Colour कोणता? वाचा

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये मोठी दुर्घटना; पाकिस्तानी खेळाडूमुळे पंच जखमी, चेंडू थेट डोक्यात...VIDEO VIRAL

Margao Land Scam: मडगावात भूखंड देण्याच्या बहाण्याने 42.50 लाखांची फसवणूक; फातोर्डा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल

कोंकणा सेन '7 वर्ष लहान' बॉयफ्रेंड सोबत गोव्यात, डेटिंगच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावर Photos Viral

SCROLL FOR NEXT