सुदिन ढवळीकर   Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhawlikar: ग्राहकांकडे 423.81 कोटींची थकबाकी; वीजमंत्री सुदिन ढवळीकरांची माहिती

थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवून वीज खात्याने पुन्हा वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) योजना सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: राज्यात 1 लाख 78 हजार वीज ग्राहकांकडे 423.81 कोटी रुपये थकबाकी आहे. यापैकी 200 कोटी रुपये थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवून वीज खात्याने पुन्हा वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) योजना सुरू केली आहे. ही योजना 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

ओटीएस योजनेचा शुभारंभ काल मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खात्याचे मुख्य अभियंता स्टिफिन फर्नांडिस , अधीक्षक अभियंता मयुरेश हेदे बँकेचे अरुण भट उपस्थित होते.

वीज खात्याच्या आधुनिकीकरणाचे अनेक कामे हाती घेतले आहेत. 397 कोटी रुपयांची कामे सुरू असून 500 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय स्मार्ट मीटरिंगसाठी 467 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली.

थकबाकीदारांसाठी वीज खात्याचे 4 पर्याय ग्राहक संपूर्ण मूळ रक्कम भरू शकतात. त्यांना विलंब अधिभार रद्द केला जाईल.

  • ग्राहक एकूण वीज बिल आठ हप्त्यांमध्ये भरू शकतील. मात्र, त्यांना संपूर्ण विज बिल भरावे लागेल.

  • जुन्या जागेवरील बिल एकरकमी भरता येईल. त्यांचा विलंब अधिभार रद्द करण्यात येईल.

  • जुन्या जागेवर नवीन कब्जा असल्यास जुने बील एकरकमी फेड केल्यास विलंब अधिभार रद्द होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT