Rohan Khaunte In Portugal Dainik Gomantak
गोवा

‘पर्यटना’साठी अभिनव तंत्राचा वापर : मंत्री खंवटे

पोर्तुगालशी पर्यटन, माहिती तंत्रज्ञानविषयक करार होणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यातील पर्यटन क्षेत्राच्या व्यापक विकासासाठी गोवा आणि पोर्तुगाल अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जाहीर केले आहे. लवकरच गोवा व पोर्तुगाल यांच्यात पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञानविषयक सामंजस्य करार केला जाईल, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मंत्री खंवटे सध्या पोर्तुगालच्या दौऱ्यावर असून तेथे गोव्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासंदर्भात या क्षेत्रातील विविध दावेदारांसमवेत बैठका घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री खंवटे 1 मार्चपासून पोर्तुगालच्या दौऱ्यावर असून त्यांनी पोर्तुगालचे वित्तमंत्री आंतोनिओ कॉस्ता यांची भेट घेऊन पर्यटन तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विषयांवर चर्चा केली. पोर्तुगाल व गोवा यांच्यात पर्यटन क्षेत्रातील भावी सहकार्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली.

पर्यटन क्षेत्रातील विकासाबाबतच्या शक्यतांवर या चर्चेचा भर होता आणि त्याविषयी उभयतांनी विचारांचे आदानप्रदान केले,असेही पत्रकात म्हटले आहे. खंवटे यांनी या दौऱ्यात पोर्तुगालच्या पर्यटन आणि वाणिज्य खात्याचे सचिव नुनो फाजेंदा यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

पोर्तुगाल-गोवा थेट हवाई मार्गासंबंधी चर्चा

पोर्तुगालमधील भारताचे राजदूत मनिष चौहान यांची खंवटे यांनी भेट घेतली आणि पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत व पोर्तुगाल यांच्यात व्यवसाय आणि गुंतवणूक याबाबत शक्यतांवर चर्चा केली.

यावेळी खंवटे यांनी पोर्तुगाल आणि गोवा यांच्यादरम्यान नव्या हवाई मार्गासाठी संबंधितांशी चर्चा केली. ओशनारियो द लिज्बोआचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोआव फाल्काव यांचीही खंवटे यांनी भेट घेतली. आपला पोर्तुगाल दौरा फलदायी ठरल्याचे खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT