Minister Rohan Khaunte Twitter@RohanKhaunte
गोवा

Goa Tourism Jobs: पर्यटन क्षेत्र गोव्यासाठी 35 टक्के रोजगार निर्माण करते, मंत्री रोहन खंवटेंचे विधान

फार्मगुडी येथील IHM च्या सुरू असलेल्या कामाची पाहणी

दैनिक गोमन्तक

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नुकतीच GTDCचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्यासह फार्मगुडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कलिनरी स्किल्स (IHM) च्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

मंत्र्यांनी डब्ल्यूआरडीचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी आणि सल्लागार रविशंकर यांच्यासोबत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

त्यांच्या भेटीदरम्यान, मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, "पर्यटन क्षेत्र गोव्यासाठी 35% रोजगार निर्माण करते. यामध्ये हॉटेल व्यवसायाला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे हॉटेल उद्योगातील कौशल्ये सुधारणे आवश्यक आहे."

ही हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट 320 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असून विद्यार्थ्यांची संख्या 500 पर्यंत वाढू शकते, असे सांगून त्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आणि संस्थेचे बांधकाम चार महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले. या दौऱ्यात सरकारी अधिकारी आणि सल्लागारही त्यांच्यासोबत होते.

दरम्यान, केपे तालुक्यातील किटला (Quitol) येथे ओशनॅरियम (सागरी मत्स्यालय) सुरू करणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. स्थानिकांसह पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल. या प्रकल्पासाठी 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT