Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: मंत्र्यांचा कर्मचाऱ्यांना दणका; एकाचे निलंबन तर गैरहजर असणाऱ्या 7 जणांना कारणे दाखवा नोटिस

प्रिटिंग आणि स्टेशनरी विभागात अचानक दिली भेट; अनेक कर्मचारी अनुपस्थित

Akshay Nirmale

Rohan Khaunte: गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्याकडे राज्यातील इतरही काही खात्यांचा कार्यभार आहे. खंवटे यांच्याकडे आयटी, प्रिटिंग आणि स्टेशनरी ही खातीदेखील आहे. खंवटे यांनी शुक्रवारी अचानक प्रिटिंग आणि स्टेशनरी विभागाला भेट दिली. त्यांच्या या अचानक भेटीने अनेक कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, या भेटीत खंवटे यांनी एका वरिष्ठ कर्मचाऱ्याला निलंबित केल्याचे समजते. तर जवळपास सात कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या भेटीत मंत्री खंवटे यांना अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यावरून उपस्थित कर्मचाऱ्यांची मंत्री खंवटे यांनी झाडाझडती घेतली. लोकांच्या सेवेसाठी कर्मचारी येथे असून ते जर कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसतील तर लोकांची कामे होणार कशी, असा जाब मंत्री खंवटे यांनी विचारला. यापुढे कर्मचाऱ्यांची असली बेफिकीर वृत्ती अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, गैरहजर असलेल्या 7 कर्मचाऱ्यांना खंवटे यांच्या मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांचे लेखी उत्तर काही दिवसात द्यावे लागणार आहे.

याशिवाय बायंडर ग्रेड दोन पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे समजते. हा कर्मचारी वारंवार गैरहजर असल्याचे समोर आले आहे. शिवाय अनुपस्थित राहण्याबाबत त्याने पूर्वकल्पना दिलेली नाही. किंवा वरिष्ठांकडून रजा मंजुर करून घेतलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याचे समजते.

मंत्री खंवटे यांच्या या भेटीची आणि कर्मचाऱ्यांवरील कारवाईबाबतची बातमी राजकीय वर्तुळात आणि कर्मचारी वर्गात दिवसभर होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT