Mauvin Godinho  Dainik Gomantak
गोवा

Mauvin Godinho: भारत विश्वात अव्वल ठरेल

भारत एक मोठा वृक्ष असून संस्कृती, समाज, परंपरा ह्या वृक्षाची मूळे आहेत

दैनिक गोमन्तक

वास्को: भारत देश एक मोठे वृक्ष असून येथील विविध संस्कृती, समाज - परंपरा ह्या वृक्षाची विविधमूळे आहेत. जशी मूळे जमनित घट्ट राहून वृक्षाला शक्तीशाली बनवते, त्याचपद्धतीने भारतात असलेल्या सर्व धर्मांच्या, समाजाच्या बांधवांनी प्रेमाने आणि एकत्रित राहून देशहीतासाठी काम करणे गरजेचे आहे. असे केल्यास आमचा भारत देश भविष्यात विश्वात प्रगतीचे अव्वल स्थानक प्राप्त करणार असून देशहीतासाठी भारतीय नक्कीच उत्तम पावले उचलणार असा विश्वास पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी व्यक्त केला.

(Minister Mauvin Godinho says India will be top in the world)

भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिना निमित्ताने ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी ‘कोकण मराठा सोश्यो - कल्चरल असोसिएशन, मुरगाव’ने कला व सांस्कृतिक खात्याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या खास कार्यक्रमावेळी पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्याबरोबर व्यासपिठावर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगरसेवक विनोद किनळेकर, यावेळी समितीतर्फे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात भाग घेतलेल्या कलाकारांचा येथे सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना गुदिन्हो म्हणाले की, भारत देशाच्या 75 व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने देशभरात नागरिकांनी ‘आजादी का अमृत महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे गुदिन्हो यांनी सांगून खरोखरच ही आनंदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. भारताच्या स्वतंत्र दिनानिमित्ताने ‘कोकण मराठा सोश्यो - कल्चरल असोसिएशन, मुरगाव’ दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असून ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

देशाच्या 75 व्या स्वतंत्र दिनानिमित्ताने ह्या समितीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच उभरत्या युवा - तरुण पिढीला त्यांची कला सर्वांसमोर सादर करण्यासाठी व्यासपिढ उपलब्ध करून प्रशंसीय काम केले असल्याचे मावीन गुदिन्हो पुढे म्हणाले.

आमचा भारत देश एक भलेमोठे वृक्ष असून देशातील विविध सांस्कृती, समाज - परंपरा ह्या वृक्षाची मूळे आहेत. जशी इतर वृक्षांची मूळे जमनित घट्ट राहून वृक्षाला शक्तीशाली बनवते त्याचपद्धतीने भारतातील सर्व समाजाच्या बांधवांनी एकत्रित आणि प्रेमाने राहून त्यांनी देशहीतासाठी काम करणे गरजेचे आहे.

देशहीतासाठी यापूर्वीसुद्धा भारतीयांनी एकत्रित राहून काम केल्याने मागील वर्षात भारताचा सर्व क्षेत्रात उत्तम विकास झालेला आहे. भविष्यातही भारतात सर्व क्षेत्रात आणखीन उत्तम विकास व्हावा यासाठी भारतीय एकत्रित राहून देशहीतासाठी उत्तमरित्या काम करणार असा विश्वास मावीन गुदिन्हो यांनी शेवटी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT