Yuva Sangam  Dainik Gomantak
गोवा

Yuva Sangam : 'युवा संगम'चे मंत्री गोविंद गावडेंच्या हस्ते उद्घाटन

हिमाचल, लडाख येथील विद्यार्थी गोव्यात दाखल

Rajat Sawant

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Goa), गोवा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत 'युवा संगम' कार्यक्रमाचे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘युवा संगम’ प्रतिनिधींचे मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यातून स्वागत करण्यात आले.

‘युवा संगम’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशातील आणि लडाखमधील विद्यार्थी आणि कर्मचारी असा चमू आज गोव्यात दाखल झाला.

गोव्यात दाखल झालेले विद्यार्थी जनसंवाद, राज्याचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा जाणून घेतील तसेच गोव्याविषयी माहिती देणाऱ्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता वाढवणे आणि देशाच्या विविध भागांतील समृद्ध सांस्कृतिक वारशांची ओळख विद्यार्थ्यांना करुन देणे हा आहे. विद्यार्थ्यांची भेट पर्यटन, परंपरा, प्रगती (विकास) परस्पर संपर्क आणि तंत्रज्ञान या पाच विस्तृत क्षेत्रांवर केंद्रित आहे.

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कला आणि संस्कृती, क्रीडा मंत्री गोविंद गावडे ‘युवा संगम’ दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT