Digambar Kamat video Dainik Gomantak
गोवा

''गोवा में 15 साल भाजप आ नहीं सकती''; दिगंबर कामतांचा Video Viral, मुख्यमंत्र्यांनी वाजवल्या टाळ्या; नेटकरी थक्क!

Digambar Kamat video viral: 'गोव्यात भाजप आणखी १५ वर्ष येत नाही' असं म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. या विधानामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की कामत असं का म्हणाले?

Akshata Chhatre

Digambar Kamat BJP statement: गोव्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये नवनिर्वाचित मंत्री दिगंबर कामत एका कार्यक्रमात असं काही बोलताना दिसत आहेत, ज्यामुळे नेटकऱ्यांना आश्चर्य वाटलेय. कामत बोलताना, 'गोव्यात भाजप आणखी १५ वर्ष येत नाही' असं म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. या विधानामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की कामत असं का म्हणाले?

या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक आमदार आणि भाजपचे नेते उपस्थित आहेत. या सर्व वरिष्ठ नेत्यांसमोर मंत्री कामत यांनी भाजप आ नाही सकती आणि यासाठी उपयुक्त वातावरण दामू नाईक यांनी तयार करावे असे विधान केल्यामुळे व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. मात्र, या व्हिडिओमागे एक वेगळंच सत्य दडलं आहे जाणून घेऊया.

व्हिडिओमध्ये अर्थाचा अनर्थ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील आवाजाची स्पष्टता कमी असल्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री दिगंबर कामत हिंदीमध्ये बोलत आहेत. ते म्हणाले की, "जिसप्रकार भारत में भाजप हार नही सकती, वैसे गोवा में १५ साल भाजप हार नही सकती." हिंदीतील 'हार नही सकती' (हरू शकत नाही) हे शब्द ध्वनीच्या अस्पष्टतेमुळे 'आ नही सकती' असे ऐकू येत आहे.

खरं तर, कामत आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या एका विधानाचा संदर्भ देत होते, ज्यात त्यांनी 'भाजपला पुढील २० वर्षे देशात कोणी हरवू शकत नाही ,' असे म्हटले होते. त्यावर कामत म्हणाले की, देशात २० जशी भाजप हरू शकत नाही, त्याचप्रमाणे गोव्यातही भाजप १५ वर्षे हरू शकत नाही. दामू नाईक यांनी अशी परिस्थिती निर्माण करावी, असे सांगत त्यांनी भाजपच्या ताकदीची प्रशंसा केली. मात्र, व्हिडिओतील चुकीच्या शब्दामुळे हा व्हिडिओ वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT