Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

खाणी खाली करण्‍याचा आदेश अजून धाब्‍यावरच

आतमध्‍ये काम सुरू : डिचोलीतील खाणीवर सामग्रीसह सुरक्षा

दैनिक गोमन्तक

डिचोली : येत्या 6 जूनपर्यंत खाणी खाली करण्याचा आदेश खाण कंपन्यांना सरकारने दिला असला तरी अद्याप डिचोलीतील खाण कंपन्यांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरू केल्याचे जाणवत नाही. दुसऱ्या बाजूने खाणमालकांनी या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले असल्याने खाणी खाली करण्याचा विषय लांबणीवर पडतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डिचोली आणि परिसरातील खाणींवर सामसूम दिसत असली तरी काही खाणींवर सामग्री तसेच सुरक्षारक्षक असल्याचे दिसून येतेय. त्यामुळे खाणींवर अंतर्गत कामकाज सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

डिचोलीत कार्यरत असलेल्या सेझाच्या (वेदांता) खाणीवरील मुख्य फाटके बंद असल्याचे दिसून येत असले तरी तेथे यंत्रसामग्री तसेच वाहने दिसून येत आहेत. फाटकांपाशी सुरक्षारक्षकही तैनात आहेत. कंपनीच्या गॅरेजमध्ये वाहन आदी सामग्री दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.

संबंधित खाण कंपनीने लहान-सहान सुटे भाग सारमानस येथील कंपनीच्या आवारात जमा केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

2012 सालापासून खाण व्यवसायावर संकट आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2018 साली लिलाव केलेले खनिज आणि बेकायदेशीर खनिज उत्‍खनन वगळता बहुतांश खाणींवरील धडधडाट बंद झाला आहे. खाणबंदीनंतर काही खाणींवरील यंत्रसामग्री हटवण्यात आली आहे. त्यामुळे या खाणींवर सध्या तरी शांतता दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

SCROLL FOR NEXT