milk supply in Goa Dainik Gomantak
गोवा

वारणा दूध दरवाढीचा राज्यात परिणाम शक्य

वारणा दूध संघाने आपल्या एक लिटर दुधाच्या बॅगमागे पुन्हा एकदा 2 रुपयांनी वाढ केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : नुकतीच एप्रिल महिन्यात दरवाढ केल्यानंतर वारणा दूध संघाने आपल्या एक लिटर दुधाच्या बॅगमागे पुन्हा एकदा 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 64 रुपयांना मिळत असणारे हायफॅट दूध 66 रुपयांना खरेदी करावे लागेल. परंतु दूध संघाने अर्धा लिटर पिशवीचे दर 25 रुपये कायम ठेवले आहेत.

परराज्यातील दूध दरवाढीचा गोव्यातीलही दुधावर परिणाम होत आला आहे. अद्याप गोवा डेअरची दूध आयात प्रक्रिया सुरू असल्याने ही प्रक्रिया पूर्ण होताच गोवा डेअरीला वाढीव दराने दूध खरेदी करावे लागू शकते.

गोवा डेअरीसाठी गोकुळ हा दूध संघ दूध पुरवठा करित होता. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी गोवा डेअरीला नेहमीच्या दूध संकलनातून शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांना परराज्यातील डेअरींकडून दूध घ्यावे लागते.

गोवा डेअरीने सोमवारी काढल्या निविदा

एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील दूध दरवाढीनंतर गोवा डेअरीच्या दुधाचे दर वाढले होते. गोवा डेअरीने सोमवारी निविदा काढत दररोज एक टँकरची मागणी केली आहे. जो दूध संघ कमी दर देऊन पुरवठा करेल, त्यांना गोवा डेअरी प्राधान्य देईल, असे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT