Goa dairy  Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy : दिवाळी उलटूनही गोवा डेअरीकडून थकबाकी नाहीच; दूध उत्पादकांमध्ये नाराजी

दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि आमची प्रलंबित बिले गोवा डेअरीने मंजूर केली नसल्याने आम्ही तो साजरा करू शकत नाही, असं खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dairy : गोवा डेअरीच्या नूतन अध्यक्षांनी डेअरीचे हरवलेले वैभव परत मिळवून देण्याचे वचन दिले असतानाही, दिवाळीपर्यंतही त्यांची थकबाकी न मिळाल्याने दूध पुरवठा करणारे शेतकरी नाराज आहेत. दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि आमची प्रलंबित बिले गोवा डेअरीने मंजूर केली नसल्याने आम्ही तो साजरा करू शकत नाही, असं खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आमची गुरे राखण्यासाठी आम्हाला खूप खर्च करावा लागतो आणि आम्हाला आशा होती की सणासुदीच्या हंगामात आमची थकबाकी भरली जाईल, परंतु आजपर्यंत आमच्या खात्यात एक पैसाही जमा झालेला नाही, असे सांगत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

महागाई आणि चाऱ्याच्या वाढत्या किमतींमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांवर बिलं थकल्याचा गंभीर परिणाम होत असून त्यामुळे व्यवसायात उत्पादनात घट झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्याच्या गोवा डेअरी संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे हित जपायचे आहे, मात्र ते करण्यात अपयशी ठरल्याचे दूध शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासकाच्या कार्यकाळात अशी परिस्थिती निर्माण झाली असती तर त्याच संचालकांनी प्रशासकाची तक्रार केली असती, अशी पुस्तीही शेतकऱ्यांनी जोडली. सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोपही यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, गोवा डेअरीच्या अध्यक्षांशी याप्रकरणी बोलण्यासाठी संपर्क होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT