Goa  Dainik Gomantak
गोवा

Migratory Birds : स्थलांतरित पक्ष्यांचा शेतीला उपद्रव; कृषी खात्याला साकडे

Migratory Birds : मायणा-कुडतरी, माकाझन येथील शेतकरी बेजार

गोमन्तक डिजिटल टीम

Migratory Bird :

सासष्टी, मायणा-कु़डतरी, माकाझन येथील शेतकरी सध्या स्थलांतरित पक्ष्यांच्या उपद्रवाने बेजार झाले आहेत.

वेस्टर्न स्वाम्फेन नामक पक्षी सध्या या भागातील शेतांवर रात्रीच्या वेळी आक्रमण करून भाताची रोपे तोडून टाकत आहेत. त्य़ामुळे या भागातील सुमारे ३० ते ४० हजार चौरस मीटर शेतीचे नुकसान झाल्याचे येथील शेतकऱ्यांची तक्रार आहे.

वालेंतीन बार्रेटो या शेतकऱ्याने सांगितले की, आम्ही सहा हजार चौरस मीटर शेतात भात लावणी केली होती; पण काही दिवसांनी भाताची कणसे तुटून खाली पडल्याचे आढळले.

सुरवातीला नेमके काय घडते, हेच कळत नव्हते; पण शेतकऱ्यांनी पाळत ठेवून शोध घेतल्यावर लक्षात आले की, रात्रीच्या वेळी काही पक्षी येऊन भाताची रोपे तोडून टाकतात.

आम्ही यासंदर्भात कृषी खात्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. कृषी खात्याचे संचालक आणि अधिकारी येऊन पाहणी करतील तसेच तोडगाही काढतील, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.

इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेशी संपर्क साधण्याची विनंती आम्ही कृषी खात्याच्या संचालकांना केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन कृषी खात्याच्या संचालकांनी सासष्टी झोनल कृषी अधिकाऱ्यांना या शेतांना भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

कसे आहेत पक्षी?

वेस्टर्न स्वाम्फेन हे गडद निळ्या रंगाचे पक्षी असून त्यांची चोच लाल आहे. हे पक्षी जगात सर्वत्र आढळतात.

हे पक्षी २०० किमी अंतरापर्यंत उडून जाऊ शकतात. जेव्हा काळोख पडू लागतो, तेव्हा ते शेतात येतात. या पक्ष्यांचे लक्ष्य केवळ भाताची रोपटी असल्याचे दिसून आले आहे. रात्रीच्या वेळी हे पक्षी तळ्यात किंवा तळ्याच्या काठावर आढळतात, असे बार्रेटो यांनी सांगितले.

पक्ष्यांची संख्याही वाढली

हे पक्षी नेमके कोण, याचे संशोधन केले तेव्हा कळले की, ते विदेशातून स्थलांतरित झाले असून त्यांचे नाव वेस्टर्न स्वाम्फेन अाहेे. पूर्वी कमी प्रमाणात पक्षी येत होते. मात्र, आता त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे बार्रेटो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT