Goa News  Dainik Gomantak
गोवा

Mid-Day Meal Plan : माध्यान्ह आहार प्रस्तावाला 'या' एनजीओंनी दिलाय प्रतिसाद, परराज्यातील स्वयंसहाय्य संस्थांचाही आहे समावेश

स्वयंसाह्य गटाच्या शिष्टमंडळाला आपली देय असणारी रक्कम 30 जूनपर्यंत अदा करू, असे आश्‍वासन आपण दिले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : माध्यान्ह आहार पुरविण्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक आणि गोवा अशा पाच बिगरसरकारी संस्था (एनजीओ) आणि स्वयंसेवी गटांनी इच्छा प्रस्ताव सादर केला आहे. शिक्षण खात्याच्यावतीने पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि अप्पर प्राथमिक शाळांसाठी माध्यान्ह आहार पुरविण्यासाठी इच्छा प्रस्ताव मागविलेले आहे.

त्यानुसार कर्नाटकातील बंगळुरूचे अक्षय पात्र, उत्तर प्रदेशातील गाझियाबादहून, दिल्लीतून एक आणि मुंबईच्या स्त्री शक्ती या अशा बिगरसरकारी संस्थांनी, तसेच स्वयंसाह्य गटांनी इच्छा दर्शविली. गोव्यातून ऑल गोवा मिड-डे मिल फेडरेशनही इच्छुक असल्याची माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

निविदा नमूद केल्यानुसार, निविदाधारकाने ५ हजार विद्यार्थ्यांना ताजे शिजवलेले भोजन पुरवावे. पुरवठादाराने पंतप्रधान पोषण योजनेंर्गत ताज्या जेवणाचा पुरवठा विना नफा तत्त्वावर करावा लागणार आहे. इतर निकष, म्हणजे पुरवठादारांना राज्य किंवा केंद्रीय संस्थांना पौष्टिक अन्न पुरवठा करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

माध्यान्ह आहारात चपातीसोबत बटाटा भाजी, मिक्स व्हेजिटेबल इडली, मूग (पातळ) भाजी चपातीसोबत, मिक्स व्हेजिटेबल पुलाव, छोले चपाती, चपातीसोबत वाटाणा भाजी आणि चपातीसोबत व्हेज कुर्मा असा आठवड्याचे पदार्थ असतील.

ठळक मुद्दे

  • 27 जुलैला शिक्षण विभागाकडून अभिव्यक्तींची बोली उघडली जाईल

  • यशस्वी बोलीदारांसोबत 15 वर्षांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी होईल.

  • नंतर हा करार पाच वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

  • भोजनाचा दर्जा किंवा तक्रार आढळल्यास करार रद्द करण्याचा अधिकार शिक्षण विभागाला आहे.

रक्कम 30 जूनपर्यंत

काणकोण व फोंडा येथील एकूण पाच हजार विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह आहाराची समस्या सोडविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे स्वयंसाह्य गटांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. स्वयंसाह्य गटाच्या शिष्टमंडळाला आपली देय असणारी रक्कम ३० जूनपर्यंत अदा करू, असे आश्‍वासन आपण दिले होते. त्यानुसार रक्कम प्राप्त झाली असून या आठवड्यापासून ही रक्कम अदा होईल, असे झिंगडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT