Indigo Flight Dainik Gomantak
गोवा

Goa Airport: मायक्रोसॉफ्टच्या 'विंडोज'मध्ये बिघाड! इंडिगोच्या 5 फ्लाईट्स रद्द, गोवा विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ

Dabolim And Mopa Airport Goa: मायक्रोसॉफ्टच्या विंडोजमध्ये झालेल्या बिघाडाचा जगभरातील विमान कंपन्यांना फटका बसला.

Pramod Yadav

मायक्रोसॉफ्टच्या विंडोजमध्ये झालेल्या बिघाडाचा जगभरातील विमान कंपन्यांना फटका बसला. भारतातील इंडिगो कंपनीला देखील याचा फटका बसल्याने गोवा विमानतळावरील पाच फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या तर काही उशीराने उड्डाण घेणार असल्याने प्रवाशांनी गोंधळ घातला.

दक्षिणेतील दाबोळी आणि उत्तरेतील मोपा या दोन्ही विमानतळांवर ही समस्या आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या दोन आणि दाबोळी विमानतळावरील तीन फ्लाईट्स रद्द करण्यात आला आहेत.

मोपा विमानतळावरुन रात्री 8:40 वाजता मुंबईसाठी उड्डाण घेणारी फ्लाईट आणि 10:10 वाजता बंगळुरुला उड्डाण घेणारी फ्लाईट रद्द करण्यात आली. तर, बोर्डिंग पास आणि लगेज टॅग बायहँड दिल्याने इतर विमान उड्डाणासाठी विलंब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दाबोळी विमानतळावरील देखील काही फ्लाईट्ला विलंब झाला. दाबोळी विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेसची कंप्युटराईज सिस्टिम सकाळी 10:10 वाजता काम करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तपासणी मॅन्युअली करण्यास सुरुवात केली.

इंडिगो कंपनीच्या दिवसभरातील २७ फ्लाईट्सपैकी तीन फ्लाईट्स (चेन्नई, अहमदाबाद आणि हैद्राबाद) रद्द करण्यात आल्या. तर, इंडिगो आणि एअर एक्सप्रेसच्या फ्लाईट्स एक ते दीड तास उशीर झाला, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT