Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: कळंगुटच्या विकासासाठी सिक्वेरा-लोबोंनी एकत्र यावे; श्रीपाद नाईकांचे आवाहन

Shripad Naik: सीएसआर निधीतून अधिकाधिक सोयी देशी तसेच विदेशी पर्यटकांना मिळवून द्याव्यात, असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले.

Sameer Panditrao

कळंगुट: कळंगुटच्या विकासासाठी राजकारणातील हेवेदावे दूर ठेवून सरपंच जोजफ सिक्वेरा तसेच आमदार मायकल लोबो यांनी एकत्र यावे व कळंगुटचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर द्यावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिला.

स्थानिक पंचायतीतर्फे उभारलेल्या मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) च्या कम्युनिटी हॉल तसेच येथील आठ कचरावाहू ट्रकचे फीत कापून उद्‍घाटन केल्यानंतर नाईक बोलत होते. यावेळी आमदार मायकल लोबो, बार्देश गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरास, पंचायत सचिव अर्जुन वेळीप, सरपंच जोजफ सिक्वेरा, उपसरपंच गीता परब, पंच सावियो गोन्सालविस, फिलोमेना फर्नांडिस, स्वप्नेश वायंगणकर, अलेक्सा कुतिन्हौ, सुनीता मयेकर, प्रसाद शिरोडकर, अॅनी फर्नांडिस, पावलू डिसोझा, कळंगुट भाजप मंडळाचे अध्यक्ष समीर चोडणकर आदी उपस्थित होते.

कळंगुटच्या किनारी भागात पर्यटकांच्या सोयीसाठी खासदार निधीचा उपयोग करावा तसेच सीएसआर निधीतून अधिकाधिक सोयी देशी तसेच विदेशी पर्यटकांना मिळवून द्याव्यात, असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले.

स्वागत उपसरपंच गीता परब यांनी केले. सूत्रसंचालन सुदेश शिरोडकर यांनी केले. आभार सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी मानले.

आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट पंचायतीकडे आजच्या घडीस सर्व सुविधा उपलब्ध असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पुढील काळात या भागात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पंचायतीने स्वत:च सोय करावी, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT