Michael Lobos resignation will not affect BJP Dainik Gomantak
गोवा

Michael Lobo: लोबोंच्या पक्षत्यागामुळे भाजपवर काडीचाही परिणाम होणार नाही

भागातील निष्ठावान पक्ष कार्यकर्ते जोमाने पक्षाच्या विजयासाठी पुन्हा सज्ज झाले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Michael Lobo: कळंगुट मतदारसंघाचे माजी आमदार तथा मंत्री राहिलेल्या मायकल लोबो यांनी पक्ष त्याग केल्याचा भाजपवर (BJP) काडीचाही परिणाम होणार नसून उलट या भागातील निष्ठावान पक्ष कार्यकर्ते जोमाने पक्षाच्या विजयासाठी पुन्हा सज्ज झाले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते गुरुदास शिरोडकर यांनी नुकताच पणजीत पक्षाच्या कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आपल्या दोनशे कार्यकर्त्यांसमवेत भाजपात फेरप्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे (Sadanand Shet Tanawade) तसेच कार्यकर्ते सुदेश शिरोडकर कार्यकर्ते उपस्थित होते. कळंगुटचे (Calangute) माजी आमदार मायकल लोबो (Michael Lobo) यांच्यामुळेच मी एकेकाळी भाजपपासून दूर गेलो होतो, परंतु आता लोबोंच पक्षातून स्वत:हून दूर गेलेले असल्याने आपण स्वखुशीने पक्षात फेरप्रवेश करत असल्याचे शिरोडकर यांनी यावेळी सांगितले. माजी मंत्री लोबोंच्या पक्ष त्यागामुळे कळंगुटची जागा रिक्त झालेली आहे. त्यामुळे मी त्या जागेवर दावा करणार असल्याची घोषणा शिरोडकर यांनी यावेळी केले. कळंगुटची जागा यापुढे पक्षासाठी राखून ठेवायची असल्याच पक्ष श्रेष्ठींनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपला प्रामुख्याने विचार करावा, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT